पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सोमवारपासून

पुणे: पूना क्लबच्या वतीने पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पूना क्लब येथे दिनांक ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. जेट सिंथेसायझर,मदर्स रेसिपी आणि जितेंद्र घडोक ग्रुप हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत, अशी माहिती पूना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील आणि चेअरमन शशांक हळबे यांनी दिली.
स्पर्धेचे यंदा ६ वे वर्ष आहे. क्लबमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते.  स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. शशांक हळबे, राहुल ढोले पाटील, सुनील हांडा, संजय लडकत, रणजित पांडे यांनी स्पर्धेचे संयोजन केले आहे.
स्पर्धेत सहभागी खेळाडूंची लिलावाद्वारे विभागणी करण्यात आली आहे. १६ वर्षाखालील हर्षवर्धन पाटील या खेळाडूला लिलावात पृथ्वी लायन्स संघाने ४ हजार ३०० रुपये अशी सर्वाधिक बोली लावून संघात घेतले. तर, ४० वर्षावरील जमीर शेख या खेळाडूला मेहता सेलर्स संघाने ३ हजार ७०० रुपये तसेच खुल्या विभागात रोहित जाशव या खेळाडूला हार्मोनी टायगर्स संघाने ७ हजार २०० रुपये अशी सर्वाधिक बोली लावून संघात घेतले.
प्रत्येक संघात १२ ते १४ खेळाडू असणार आहेत. यातील ९ खेळाडू मैदानात असतील. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरी स्वरुपात होणार आहे. प्रत्येक सामना ६ षटकांचा असणार आहे. स्पर्धेत बारा संघ सहभागी होणार असून, या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. या दोन गटांतून चार संघ उपांत्य फेरीत दाखल होतील आणि त्यानंतर अंतिम सामना १६ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम यष्टिरक्षक, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज यांनाही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहे.
संघ आणि संघ मालक : मेहता सेलर्स- सुमीरन मेहता, मॅक्जिमम मॉव्हरिक्स – ललित सोलंकी, टायफून्स कुमार प्रॉपर्टीज – मनीष जैन, हार्मोनी टायगर्स -हरिश सोलंकी, क्वालिटी वॉरियर्स -आरव विज, लुंकड ईगल्स -अमित लुंकड, पृथ्वी लायन्स – अमर सेहेम्बे, द किंग्जस् – अमर छाब्रा, क्रिमसन्स परमार आॅल स्टार्स – हिरेन परमार, जेट सिंथेसायजर्स – राकेश नवानी, जितेंद्र सिंग युरिस्का जॅग्वार –  गौरव घडोक, हर्म्स व्हेव्ज – रक्षय ठक्कर.