रायझिंग पुणे सुपरजायंटचा अनोखा विक्रम

११ एप्रिल रोजी गहुंजे एमसीए मैदानावर झालेल्या पुणे आणि दिल्लीमधल्या सामन्यात अनोखा विक्रम घडला. पुणे ९७ धावांनी हरले खरे, पण जे बळी गेले ते सुद्धा झेलबाद झाले. पुणे संघाचे १०च्या १० फलंदाज झेलबाद झाले आणि आयपीएलमध्ये असे होण्याची ही पहिलीच वेळ. सर्व झेलांपैकी ३ झेल यष्टीरक्षक पंतने घेतले तर उर्वरीत झेल क्षेत्ररक्षकांनी घेतले.

 
आजवरच्या आयपीएल इतिहासात असे कधीच घडले नाही आणि इतर टी-२० सामन्यात असे होण्याची ही १० वी वेळ आहे. विशेष म्हणजे आंतराष्ट्रीय टी -२० सामन्यात असे कधीच घडले नाही.