पुण्याचे संघमालक असे कसे ..??

काल झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात पुण्याने मुंबई संघाला ७ गडी राखून हिरवले. या विजयात मोलाचा वाटा होता कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अजिंक्य रहाणे यांचा. स्मिथच्या शेवटच्या दोन षटकारांमुळे पुण्याचा विजय निशचित झाला.

हे सर्व घडत असताना संघ मालक हर्ष गोएंका यांनी एक ट्विट केला व सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटले. माजी कर्णधार एम. एस. धोनी आणि स्टिव्ह स्मिथ या मध्ये उजवा कोण असे म्हणत त्यांनी सामना संपल्यावर ट्विट केला. संघमालकच जेव्हा अश्या गोष्टी करतो तेव्हा त्या संघावर काय परिणाम होत असेल ते आपल्याला मागच्या वर्षीच्या कामगिरीवरून समजलेच असेल. पहा काय म्हणाले गोएंका आणि त्यांना मिळालेल्या प्रतिक्रया.