पुण्यातील आयपीएल प्ले-आॅफ सामने दुसऱ्या शहरात हलवणार

पुणे | चेन्नई सुपर किंग्जचे पुण्यात ६ सामने होणार आहेत परंतू पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी एक अपेक्षाभंग करणार वृत्त आहे. 

पुण्यात होणारे आयपीएल प्ले आॅफचे सामने दुसरीकडे हलवले जाणार आहे. 

पुण्याचा संघ नसूनही पुण्याला साखळी फेरीचे सामने दिले असल्यामूळे हे प्ले आॅफचे सामने इतरत्र हलवले जाणार आहेत. 

“आम्ही पुण्यातील प्ले आॅफ आणि काॅलिफायरचे सामने अन्य शहरात हलवणार आहे. आम्ही याबद्दल एक दोन दिवसांत निर्णय घेऊ. ” असे अायपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले. 

हे सामने कोणत्या शहरात होणार आहेत याबद्दल मात्र कोणतेही वृत्त नाही.  हे सामने पुणे शहरात २३ आणि २५ मे रोजी होणार होते. 

त्यामूळे आता पुण्यात फक्त चेन्नई सुपर किंग्जचे ६ सामने होणार आहेत.