पुणेरी पलटण तर्फे प्रो कबडडी लिगच्या सिझन ६ साठी गिरीष एर्नाकची कप्तानपदी निवड

पुणेरी पलटणचे खेळाडू आणि व्यवस्थापकांच्या हस्ते विवो प्रो कबडडी सिझन ६ साठीच्या जर्सीचे अनावरण

पुणे । पुणेरी पलटण, या विवो प्रो कबड्डी लीग सिझन ६ मधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघातर्फे तरुण आणि तडफदार खेळाडू गिरीश एर्नाकचे नाव येत्या सिझन साठी कप्तान म्हणून जाहीर करण्यात आले. गिरीष, सिझन ५ पासून पुणेरी पलटणचा अविभाज्य सदस्य राहिला असून संघाच्या विजयात त्याचा महत्वाचा सहभाग राहिला आहे.

श्री कैलाश कांडपाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणेरी पलटण, तसेच कप्तान गिरीश एर्नाक आणि मुख्य प्रशिक्षक अशन कुमार यांनी सिझन ६ साठीच्या जर्सीचे तसेच एका आकर्षक दृक्श्राव्य चित्रफितीचे अनावरण केले. फोर्स मोटर्स आणि किर्लोस्कर ब्रदर्स लि यांच्याशिवाय, झिओमी इंडिया हा नवीन ब्रँड, स्मार्टफोन पार्टनर म्हणून संघाशी जोडला गेला आहे. श्री प्रवीण कर्नावत, वरिष्ठ ऊपाध्यक्ष, (कार्पिरेट मटेरियल), फोर्स मोटर्स आणि श्री अनुराग व्होरा, किर्लोस्कर ब्रदर्सचे इंडिया बिझनेस हेड, हेही या प्रसंगी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.

या शुभप्रसंगी बोलताना, श्री कैलाश कांडपाल, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणेरी पलटण, म्हणाले, “कबड्डीसारख्या मातीत रुजलेल्या खेळावर तसेच पुणेरी पलटणवर विश्वास दाखवणाऱ्या सर्व प्रायोजकांचा मी अतिशय आभारी आहे. या सीझनमध्ये गिरीष संघाचा कप्तान म्हणून कार्यभाग सांभाळेल. मला खात्री आहे कि आपल्या नेतृत्वगुणांमुळे तो सिझन ६ मध्ये संघाची कामगिरी उंचावेल. फोर्स मोटर्स, किर्लोस्कर ब्रदर्स लि आणि इक्विओ यांनी संघाशी बांधिलकी कायम राखल्याने सिझन ६ ची सुरुवात चांगली झालेली आहे.

झिओमी इंडीया या वर्षी नव्याने आमच्या सोबत आलेले आहेत. या ब्रँड्सनी सातत्याने दाखवलेल्या विश्वासामुळे संघ, खेळाडू आणि खेळ बलाढ्य बनला आहे. हे ब्रॅण्ड्स खेळाशी संलग्न झाल्यामुळे खेळाचे मूल्य वाढते, इतकेच नव्हे तर क्रीडारसिकांनाही विविध उपक्रमाच्या माध्यमांतून या ब्रॅंड्सशी जोडणारा एक मंच उपलब्ध होतो. आमच्या चाहत्यांचा एक संच बनला आहे जो प्रत्येक सिझन नुसार वाढत चालला आहे आणि त्यांचा उत्साह आणि आधार, संघाला प्रत्येक सीझनमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साही करत असतो.”

या आनंदाच्या क्षणी, पुणेरी पलटणचा नवनियुक्त संघनायक गिरीष एर्नाक म्हणाला, “संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली त्यामुळे मला सन्मानित झाल्याचे जाणवते आहे. मला कल्पना आहे कि ही केवळ एक पदवी नसून एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे. व्यवस्थापनाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मला कृतज्ञ वाटते आणि मी सर्व भावी सामन्यांत पुणेरी सिंह सर्वात जोराची गर्जना करेल यासाठी पूर्णतः प्रयत्नशील राहीन. एक संघ म्हणून आमच्या प्रत्येक सदस्यांचे प्रशिक्षण आणि शक्तिवर्धन यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशन सरांच्या मार्गदर्शनाखाली या सीझनमध्ये आम्ही ट्रॉफी जिंकू या बद्दल आम्हला खात्री आहे.”

श्री प्रसन फिरोदिया, व्यवस्थापकिय संचालक, फोर्स मोटर्स, यांच्या मते,”कबड्डी हा आमच्या ग्रामीण भारतातील ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला स्वदेशी खेळ आहे. अस्सल मातीतल्या या खेळाशी आमचा सहयोग आमच्या स्वदेशी, सशक्त आणि चपळ अशा उत्पादनांच्या श्रेणीचे प्रतीक आहे. विविध प्रकारे उपयुक्त असलेली आमची ‘ट्रॅक्स’ श्रेणी तसेच शेतीसाठीचे ‘बलवान’ ट्रॅक्टर,

अशाच प्रकारचे गूण दर्शवतात. पुण्याचा स्थानिक संघ असलेल्या पुणेरी पलटणशी निगडीत झाल्याने आम्हाला आनंद होतो आहे. या सिझनमध्ये या संघाकडून नेत्रदीपक यशाची आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही संघाला शुभेच्छा देतो.”

श्री अनुराग व्होरा, इंडिया बिझनेस हेड, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड म्हणाले, “पुणेरी पलटण या संघाचे सतत दुसऱ्या वर्षी सह-प्रायोजक होताना आम्ही उत्साहित आहोत. पारंपारिक भारतीय खेळाशी निगडीत होऊन आम्ही सन्मानित झालो आहोत. केबीएल आणि कबडडी मध्ये बरेच साम्य आहे. या वर्षी केबीएल आपल्या अस्तित्वाचे १३० वे वर्ष साजरे करत आहे आणि कबड्डी या स्पर्धात्मक खेळाचा प्रारंभसुद्धा विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच झाला असावा. कबडडी खेळण्यासाठी असाधारण शक्ती, चापल्य आणि धोरणीपणाची गरज असते. केबीएलचे पंपसुद्धा बाजारात विश्वसनीयता, टिकाऊपणा, कामगिरी आणि नावीन्यासाठी प्रसिद्द आहेत.