असा असेल पुणेरी पलटणचा प्रो कबड्डीचा संघ

इन्शुरेंकोट स्पोर्ट लिमिटेड मालक असलेल्या पुणेरी पलटण संघाने दीपक हुडा या आपल्या एकमेव खेळाडूला कायम ठेवत लिलावात भाग घेतला. ४ कोटी या निर्धारित रकमेमधील १९.६० लाख शिल्लक ठेवत या संघाने १५ खेळाडूंच्या चमूत १३ भारतीय तर २ परदेशी खेळाडूंना संधी दिली.

प्रो कबड्डीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मोसमात तळाला राहिलेल्या पुणेरी पलटण संघाने तिसऱ्या मोसमात मनजीत चिल्लर, दीपक हुडा आणि अजय ठाकूर या स्टार खेळाडूंना संधी देत स्पर्धेत ३ क्रमांक मिळविला. परंतु चौथ्या मोसमात पुन्हा हा कित्ता न गिरवता आल्यामुळे संघ चौथ्या स्थानी फेकला गेला. त्यामुळे या मोसमात पुणेरी पलटणने संघबांधणीवर विशेष लक्ष दिल्याचे दिसते.

पहिल्या दिवसाच्या लिलावात पुण्याने ऑल राउंडर संदीप नरवालला संघात स्थान दिले. संघात नवख्या आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल राखण्यासाठी पुण्याने ४३ वर्षीय बचावपटू धर्मराज चेरलाथन आणि रेडर राजेश मोंडाला संघात स्थान दिले.
असा असेल संघ

रेडर
दीपक हुडा, राजेश मोंडल, रोहित चौधरी, अक्षय जाधव, मोरे जिबी, उमेश म्हात्रे, सुरेश कुमार
बचाव
गिरीश इर्नाक, धर्मराज चेरलाथन, मोहम्मद झिओर रहमान
ऑल राउंडर
संदीप नरवाल, रवी कुमार, टाकामिस्तु कोनो, अजय, नरेंद्र हुडा