प्रो कबड्डी: पुणेरी पलटण देणारा का पाटणा पायरेट्सला या मोसमातील पहिली हार !

आज प्रो कबड्डीच्या ३८व्या सामन्यात प्रदीप नरवालची पाटणा पायरेट्स आणि दीपक हुडाची पुणेरी पलटण आमने सामने येणार आहेत.

दोन वेळचे प्रो कबड्डी विजेते पाटणा पायरेट्स हा असा एकमेव संघ आहे जो या मोसमात एकदा ही हरला नाही. संघाच्या यशात सिंहाचा वाट आहे तो म्हणजे कर्णधार डुबकी किंग प्रदीप नरवालचा. त्याने प्रत्येक सामन्यात चमकदार खेळी केली आहे आणि त्यामुळे झोन बीमध्ये पाटणा पायरेट्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील सामन्यात प्रदीप खराब फॉर्ममध्ये दिसत होता तरी सुद्धा त्याने ९ गुण मिळवले. पाटणच्या डिफेन्सची धुरा विशाल मानेच्या खांदयावर असणार आहे.

दुसऱ्या बाजूला बघता पुणेरी पालटणे आता पर्यंत झालेल्या ४ सामन्यात फक्त एक सामना गमावला आहे. मागील सामन्यात पुण्याने बंगाल वोरीयर्सचा १७ गुणांनी धुव्वा उडवला होता. पहिल्या काही सामन्यात खराब फॉर्मनंतर कर्णधार दीपक हुडाने ही फॉर्ममध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. पण पाटणाला खरी भिती असेल ती अष्टपैलू संदीप नरवालची. संदीप या मोसमात अफलातून फॉर्ममध्ये आहे. त्याने आता पर्यंत ४ सामन्यात २४ गुण मिळवले आहेत.

या सामन्यात आपण संदीप नरवाल विरुद्ध प्रदीप नरवाल असा एक संघर्ष देखील पाहायला मिळणार आहे.