पुणेरी पलटणने केले “बोल कबड्डी” चे अनावरण

पुणे । पुणेरी पलटणने महिला दिनाचे औचित्य साधून खास मुलींसाठी आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे ४ मार्च २०१८ रोजी फिनिक्स मार्केट सिटी, विमान नगर, पुणे मध्ये आयोजन केले होते. ह्याच वेळी पुणेरी पलटणने “बोल कबड्डी” चे अनावरण केले. 

कबड्डीमध्ये नारी शक्तीला सलाम करीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या दिग्गज महिला कबड्डीपटू दीपिका जोसेफ ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

दीपिकाने कबड्डी विश्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव गौरविले आहे. भारताला २०१० आशियाई खेळांमध्ये, २०१२ दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत, २०१२ प्रथम महिला कबड्डी वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. दीपिकाने कबड्डी मध्ये मुलींना स्वतःचे स्वप्न साकार करण्याची उमेद दिली. 

पुणेरी पलटणने नेहमीच कबड्डीला पाठींबा दिला आहे आणि कबड्डी आजच्या युवक/युवतींमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. 

दीपिकाने तिचे मनोगत व्यक्त करताना असे म्हणाली की, “ह्या मुलींना कबड्डी खेळताना बघून मला खूप आनंद झाला. मला माझे लहानपणीचे कबड्डीचे दिवस आठवले. ह्या मुलींमध्ये खूप कौशल्य आहे आणि मला विश्वास आहे की भविष्यात ह्या मुली भारतीय कबड्डीचे शिल्पकार ठरतील. पुणेरी पलटणच्या “बोल कबड्डी” ह्या संकल्पने बद्दल अभिनंदन करू इच्छिते. वेल डन गर्ल्स आणि पुणेरी पलटण.”

ह्या प्रसंगी कैलाश कांडपाल, सीइओ, पुणेरी पलटण असे बोलले की, “पुणेरी पलटणच्या खूप महिला फँस आहेत ज्या नेहमीच सोशियल मीडिया द्वारे टीमशी संवाद साधत असतात. कबड्डी हा खेळ फक्त मुलांपर्यंत मर्यादित नसून, मुली ही कबड्डी तितक्याच निपुणतेने खेळतात. 

महिलांना धन्यवाद देण्याचा हा आमचा असा वेगळा प्रयत्न होता. ह्या मुलींनी आज सिद्ध केले की भारतीय महिला कबड्डीला सुवर्ण दिवस दाखवायला ह्या सक्षम आहेत.”

ह्या स्पर्धेस पालकांनी पण आवर्जुन हजेरी लावली. ह्या स्पर्धेचे विजेते ठरले जन प्रबोदिनी हाय स्कूल. जन प्रबोदिनी हायस्कूलने (१९) संत साई इंग्लिश मिडीयम स्कूल (१६) ३ गुणांनी मात दिली. उपविजेते ठरले संत साई इंग्लिश मिडीयम स्कूल आणि तिसऱ्या क्रमांकावर नागेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल आले.