एशियन गेम्सचा पाॅकेटमनी सीमा पुनीया देणार केरळमधील महापूर ग्रस्तांना

18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला महिलांच्या थाळी फेकमध्ये गुरुवारी सीमा पुनीयाने कांस्यपदक मिळवले. यानंतर काही वेळातच तिने 1 लाख आणि तीला एशियन गेम्ससाठी मिळलेली पॉकेटमनी(जवळजवळ 49,000) केरळमधील महापूर ग्रस्तांसाठी मदत करणार असल्याचे सांगितले आहे.

याबद्दल सीमा पुनीया म्हणाली, ” मी ठरवले आहे की माझी पॉकेटमनी आणि लाख रुपये केरळ महापूरग्रस्तांना देणार आहे. तसेच फक्त हेच नाही तर मी केरळमध्ये जाऊन तेथील लोकांना मदत करण्याचाही प्रयत्न करणार आहे. ते अलीकडच्या काळात खूप भयानक गोष्टींमधून गेले आहेत.”

तसेच तिने अन्य भारतीय खेळाडूंनाही केरळ राज्यासाठी अशी मदत करण्याचे आवाहन केले आहे. ती म्हणाली, “मी देशातील अन्य अॅथलिट्सलाही केरळमधील महापूर ग्रस्तांसाठी त्यांच्या पॉकेटमनीतील अर्धे पैसे देण्याचे आवाहन करते.

तसेच तिच्या कामगिरीनंतर 2020 च्या आॅलिम्पिकमध्येही पदक मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

35 वर्षीय सीमाने 62.26 मीटर थाळीफेक करत तिच्या सहा वर्षातील उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

सीमाने तिसऱ्या प्रयत्नात 62.26 मीटर थाळीफेक केले. यावेळी तिने 2014च्या एशियन गेम्समध्ये केलेला 61.03 मीटरचा विक्रम मोडला. तिच्याकडे आता राष्ट्रकुल स्पर्धेचे चार आणि एशियन गेम्सचे दोन पदके आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर

एशियन गेम्स: भारताला सेलींग क्रिडा प्रकारात १ रौप्य आणि २ कांस्य पदके

टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देणारा प्रशिक्षक होणार आरसीबीचा ‘महागुरू’