बोगस पदवी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या क्रिकेटर हरमनप्रीत कौरला मोठा दिलासा

भारतीय महिला टी-20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मोठा दिलासा मिळाला आहे.

हरमनप्रीत कौरने उपअधीक्षक पदासाठी बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले होते. त्यामुळे पंजाब सरकारने मार्च महिन्यात हरमनप्रीत कौरला दिलेले  उपअधीक्षक पद नुकतेच काढून घेण्यात आले होते.

उपअधीक्षक पदासाठी बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याने हरमनप्रीत कौरवर पंजाब सरकार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता होती.

मात्र पंजाब सरकारच्या सुत्रांनुसार पंजाब सरकार हरमनप्रीतवर फसवणुकीचा कोणताही गुन्हा दाखल करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

“या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका चांगल्या क्रिकेटपटूच्या कारकिर्दीचे नुकसान होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तसेच भविष्यात जर हरमनप्रीतने पदवी पूर्ण केली तर पोलीस उपअधीक्षक पदासाठी विचार केला जाईल.” पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंंग हरमनप्रीतच्या या प्रकरणावर बोलताना म्हणाले.

2017 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतची तीच्या या कामगिरीसाठी पंजाब सरकारने पोलिस उपअधीक्षक पदी निवड केली होती.

मात्र उपअधीक्षक पदासाठी पंजाब पोलिसांकडून हरमनप्रीतच्या पदवी प्रमाणपत्राची पाडताळणी करताना हरमनप्रीतने पंजाब पोलिसांसमोर बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले होते.

भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरचे पोलीस उपअधीक्षक पद पंजाब सरकारने काढून घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-टीम इंडिया अव्वल स्थान पुन्हा मिळविण्याचे समीकरण?

-तो गोलंदाज म्हणतो, विराटला दौरा गाजवणे तर सोडा एक शतकही करु देणार नाही