पीव्ही सिंधूची ऐतिहासिक सुवर्णमय कामगिरी

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने वर्ल्ड टूर महिलांच्या अंतिम फेरीत जपानच्या गतविजेती वर्ल्ड चॅम्पियन नोझोमी ओकुहाराला पराभूत करत सुवर्ण पदक पटकावले आहे. यामध्ये तिने ओकुहाराला 21-19, 21-17 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले आहे.

सिंधूचे या स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक आहे. ती 2017च्या अंतिम फेरीत जपानच्या अकान यमागुचीकडून पराभूत झाली होती. तर 2016च्या उपांत्य फेरीत पराभूत झाली होती.

तसेच या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी सिंधू पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. याआधी 2011ला सायना नेहवाल अंतिम फेरीत पोहचली होती. तर 2009च्या स्पर्धेत ज्वाला गुट्टा आणि व्ही डीजू उपविजेते ठरले होते.

सिंधूच्या आतापर्यतच्या कारकिर्दीतील हा 300वा विजय आहे.

सिंधू आणि ओकुहारा यांच्यात 13 सामने झाले असून सिंधू 7 विजयाने आघाडीवर आहे. तर ओकुहारावर हा तिचा सलग दुसरा विजय आहे.

या सामन्यात सिंधूने ओकुहारावर मागील वर्षाचा वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील अंतिम फेरीचा वचपा काढत चांगला खेळ केला.

पहिल्या सेटमध्ये ओकुहाराने काही चुका केल्या. ज्यामुळे सिंधू 7-3 अशी आघाडीवर राहिली. तर ओकुहाराने खेळ उंचावत सेट 7-5 असा केला. 19-17 असा सेट असताना सिंधूने तीन गेम पॉइंट्स मिळवत सेट आपल्या नावे केला.

ओकुहारने दुसऱ्या सेटमध्ये उत्तम प्रकारे खेळत 7-7 असा बरोबरीचा खेळ केला. या सेटमध्ये काही वेळेला सिंधूच आघाडीवर होती. हीच आघाडी कायम राखणे तिला काही वेळला अवघड जात होते. पण तिने तीन गेम पॉइंट्स मिळवत अखेर विजय पक्का केला.

वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि ऑलिंपिक रौप्यपदक विजेती सिंधूचे हे 14वे विजेतेपद आहे. यावर्षी तिने वर्ल्ड चॅम्पियनशीप, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, थायलंड ओपन आणि इंडिया ओपन या सगळ्यामध्ये रौप्यपदक जिंकले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

‘हे कधी, केव्हा आणि कशासाठी ?’, हरभजनचा सायमंड्सला प्रश्न

कसोटीमधील चौथ्या क्रमांकावरची कोहलीने केली ‘विराट’ कामगिरी

तब्बल २६ वर्षांनंतर पर्थमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली बनला केवळ चौथा भारतीय