सिंधूने ऐतिहासिक विजय केला पंतप्रधानांना समर्पित

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने कोरिया ओपन जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. या अगोदर कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूने कोरिया ओपन सुपर सिरिज जिंकण्याची कामगिरी केलेली नव्हती. त्यामुळे तिच्या यशाचे कौतुक जगाच्या कानाकोपऱ्यातून होत आहे.

पी.व्ही.सिंधूचे कौतुक करणाऱ्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी सिंधूला कोरिया ओपन जिंकल्यानंतर ट्विटरवरून लगेच शुभेच्छा दिल्या. त्या ट्विटमध्ये ते म्हणाले,”कोरियामध्ये विजेती म्हणून उद्यास आल्याबद्दल अभिनंदन. भारताला तिच्या विजयाचा खूप अभिमान आहे ”

१७ सप्टेंबर रोजी सिंधूने कोरिया ओपन जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवस होता. त्यामुळे सिंधूने तिचा ऐतिहासिक विजय पंतप्रधानांना समर्पित केला.

त्या ट्विटमध्ये सिंधू म्हणते, ” मी हा विजय आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी समर्पित करते. हा विजय त्यांच्या निस्वार्थ आणि न थकता आपणाला ते देत असणाऱ्या योगदानासाठी.”