पी व्ही सिंधू होणार उप जिल्हाधिकारी

भारताची पहिली आणि एकमेव ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती महिला खेळाडू पी व्ही सिंधू हिने आंध्र प्रदेश सरकाने दिलेल्या सरकारी नोकरीचा स्वीकार केला आहे. आंध्र सरकाराने उप जिल्हाधिकारी पदाची सिंधूला ऑफर दिली होती.

२१ वर्षीय सिंधू २०१३ पासून भारत पेट्रोलियम बरोबर काम करत असून असिस्टंट मॅनेजर (स्पोर्ट्स) पदावर हैद्राबाद येथे कार्यरत आहे. कारणाम मल्लेश्वरी, मेरी कॉम, साईना नेहवाल आणि साक्षी मलिक नंतर सिंधू हि फक्त पाचवी भारतीय महिला खेळाडू आहे जिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. ऑलिम्पिक रौप्य पदकानंतर सिंधूवर बक्षिसांची खैरात झाली होती. तेलंगणा सरकारने ५ कोटी तर आंध्र सरकारने ३ कोटी बक्षीस म्हणून सिंधूला दिले होते. त्याचवेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबा नायडू यांनी तिला क्लास १ दर्जाची नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. आणि आज तिने ह्या ऑफरचा स्वीकार केला होता.