पीव्ही सिंधूने एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रचला इतिहास

इंडोनोशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतीय बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या उंपात्य सामन्यात जपानच्या अकान यमागुचीला पराभूत करून अंतिम फेरीत पोहचली आहे.

एशियन गेम्समधील बॅटमिंटनच्या एकेरी किंवा दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहचणारी ती पहिलीच भारतीय बॅटमिंटनपटू ठरली आहे.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने यमागुचीला २१-१७, १५-२१, २१-१० असे पराभूत केले.

याआधी सिंधूने यमागुचीला चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत आणि आताच्या गेम्समधील संघाच्या सामन्यात हरवले आहे. या सामन्यात दोघींकडूनही काही चुका झाल्या पण शेवटी सिंधूनेच बाजी मारली.

पहिल्या सेटमध्ये सिंधूने काही चुका केल्या होत्या पण त्या सुधारत तिने तो सेट २१-१७ असा जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये यमागुचीने अधिक चांगला खेळ केल्याने तीने दुसरा सेट १५-२१ असा जिंकला. तर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सिंधूने तिचा खेळ उंचावत हा सेटसोबत  सामनाही जिंकला.

अंतिम फेरीत सिंधूचा सामना चायनीज तैपईच्या ताइ त्झू यींग हिच्याशी होणार आहे. हा सामना उद्या (२८ ऑगस्ट) आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

“हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था…. “

पंड्या ब्रदर्स खेळणार २०१९ विश्वचषकात?