ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत पीवाय फॅसिलिटीज,  अमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर संघांचे विजय

पुणे:  ई2डी स्पोर्ट्स यांच्या तर्फे ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत  पीवाय फॅसिलिटीज,  अमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर या संघांनी अनुक्रमे एलेनो एनर्जी  व एएफके इलेव्हन संघांचा पराभव करून आगेकूच केली.

लवळे येथील ई2डी क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात आशिष शर्मा(नाबाद 59)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पीवाय फॅसिलिटीज संघाने एलेनो एनर्जी संघाचा 38 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना पीवाय फॅसिलिटीज संघाने  20षटकात 6बाद 146धावा केल्या. यात आशिष शर्माने 37चेंडूत 6चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 59धावा केल्या. आशिषला  अभिजित बाकरे 28, अमित शर्मा 13यांनी धावा काढून सुरेख साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना एलेनो एनर्जी संघ 18.4षटकात सर्वबाद 108धावावर संपुष्टात आला. यात  प्रवीण पाटील 30, हनुमंत गाडे 21, अजय निकम 15यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पीवाय फॅसिलिटीज कडून राज सांबरे 3-12, आलोक व्यवहारे 2-16, अभिजित बाकरे 2-19यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी आशिष शर्मा ठरला.

दुसऱ्या सामन्यात शैझाद शेख याने केलेल्या 68 चेंडूत नाबाद 70 धावांच्या खेळीच्या जोरावर अमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर संघाने एएफके इलेव्हनचा 31

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

पीवाय फॅसिलिटीज: 20षटकात 6बाद 146धावा(आशिष शर्मा नाबाद 59(37,6×4,2×6), अभिजित बाकरे 28(35,3×4), अमित शर्मा 13(16),अजय निकम 3-12, प्रवीण पाटील 1-21, अभिजित चव्हाण 1-35) वि.वि.एलेनो एनर्जी: 18.4षटकात सर्वबाद 108धावा(प्रवीण पाटील 30(21,3×4), हनुमंत गाडे 21(15), अजय निकम 15(17), राज सांबरे 3-12, आलोक व्यवहारे 2-16, अभिजित बाकरे 2-19);सामनावीर-आशिष शर्मा;

अमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर:20 षटकात 9बाद 124धावा(शैझाद शेख नाबाद 70(68,8×4,1×6), नरेंद्र देसाई 16(19), अजय कोकाटे 2-14, ताराप्रकाश 2-31)वि.वि.एएफके इलेव्हन:18.2 षटकात सर्वबाद 93 धावा(प्रतीक रोकडे 15(22), विकास जगदाळे 14, सुरज कदम 11, उमेर अहमद 3-16, उमर पिरजादा 2-14); सामनावीर- शैझाद शेख