आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ व डेक्कन अ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायसी अ व डेक्कन अ या संघांनी एफसी अ व पीवायसी क संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत इलाईट डिव्हिजन गटात पहिल्या सामन्यात पीवायसी अ संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत एफसी अ संघाचा 24-4असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली.

सामन्यात पीवायसीच्या 100अधिक गटात केदार शहा व डॉ. अभय जमेनिस यांनी एफसीच्या संजय रासकर व पुष्कर पेशवा यांचा 6-1 असा तर, खुल्या गटात पीवायसीच्या केतन धुमाळने अभिषेक ताम्हाणेच्या साथीत एफसीच्या सचिन साळुंखे व गणेश देवखिळे यांचा 6-0असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली.

त्यांनतर 90अधिक गटात पीवायसीच्या जयंत कढे व ऋतू कुलकर्णी या जोडीने एफसीच्या शंभू तावरे व पंकज यादव यांचा 6-1 असा तर, खुल्या गटात केदार शहा व प्रशांत सुतार यांनी धनंजय कवडे व पुष्कर पेशवा यांचा 6-2 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत डेक्कन अ संघाने पीवायसी क संघाचा 21-11असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून मुकुंद जोशी, नंदन बाळ, मदन गोखले, अजय कामत, विक्रांत साने, ऋषिकेश पाटसकर यांनी अफलातून कामगिरी केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी: इलाईट डिव्हिजन

पीवायसी अ वि.वि.एफसी अ 24-4(100अधिक गट: केदार शहा/डॉ. अभय जमेनिस वि.वि.संजय रासकर/पुष्कर पेशवा 6-1; खुला गट: केतन धुमाळ/अभिषेक ताम्हाणे वि.वि.सचिन साळुंखे/गणेश देवखिळे 6-0;90अधिक गट: जयंत कढे/ऋतू कुलकर्णी वि.वि.शंभू तावरे/पंकज यादव 6-1; खुला गट: केदार शहा/प्रशांत सुतार वि.वि.धनंजय कवडे/पुष्कर पेशवा 6-2);

डेक्कन अ वि.वि.पीवायसी क 21-11(100अधिक गट: मुकुंद जोशी/नंदन बाळ वि.वि.राधिका कानिटकर/शैलेश डोरे 6-1; खुला गट: मंदार वाकणकर/संग्राम चाफेकर पराभूत वि.अनुप मिंडा/वरुण मागीकर 3-6; 90अधिक गट: मदन गोखले/अजय कामत वि.वि.अमित पाटणकर/सारंग पाबळकर 6-1;खुला गट: विक्रांत साने/ऋषिकेश पाटसकर वि.वि.राधिका कानिटकर/हिमांशू गोसावी 6-3).