पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक स्पर्धेत पहिल्या दिवसाअखेर केडन्स संघाचे वर्चस्व

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात अचूक गोलंदाजी करत केडन्स संघाने क्लब ऑफ महाराष्ट्रला 166 धावांवर रोखले व त्यानंतर निखिल पराडकर(57धावा) व गणेश गायकवाड नाबाद(57धावा) यांनी शतकी भागीदारी करून 17 धावांची आघाडी राखत पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. तर, दुसऱ्या सामन्यात ऋषिकेश मोटकर(84 धावा) व विश्वराज शिंदे(48धावा) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर पूना क्लब संघाने पीवायसी संघासमोर 213 धावांचे आव्हान उभे केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या डावात केडन्स संघाच्या अचूक व शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 30.3षटकात 166धावांवर आटोपला. 10 गडी बाद झाल्याने क्लब ऑफ महाराष्ट्रची अंतिम धावसंख्या 116 झाली. यात देवदत्त नातू 49, निकित धुमाळ 26, यश क्षीरसागर 25, नौशाद शेख 23, यांनी थोडासा प्रतिकार केला. केडन्सकडून गणेश गायकवाडने 20 धावात 3 गडी, तर सिद्देश वरगंटी(30-2), हर्षद खडीवाले(23-2), इझान सय्यद(45-2)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. याच्या उत्तरात केडन्स संघाने सावध सुरुवात केली. सलामीचे फलंदाज अथर्व धर्माधिकारी 20, हर्षद खडीवाले 14 हे झटपट बाद झाल्यानंतर निखिल पराडकर 82 चेंडूत 57धावा व गणेश गायकवाड 86 चेंडूत नाबाद 57धावा यांनी पाचव्या गडयासाठी 158 चेंडूत 117 धावांची करत संघाच्या डावाला आकार दिला. आजदिवसअखेर केडन्स संघाने 35 षटकात 5बाद 183धावा करून पहिल्या डावात 17 धावांची नाममात्र आघाडी घेतली. केडन्सचा उर्वरित 5 षटकांचा खेळ अजून बाकी आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील सामन्यात पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना पूना क्लब संघाने 38.3षटकात 213 धावा केल्या. 10 गडी बाद झाल्याने पूना क्लबची अंतिम धावसंख्या 163झाली. पूना क्लब 19.1षटकात 7 बाद 111 असा अडचणीत असताना ऋषिकेश मोटकरने 107 चेंडूत 11 चौकारांसह 84 धावा व विश्वराज शिंदेने 77 चेंडूत 48 धावा केल्या. ऋषिकेश मोटकर व विश्वराज शिंदे यांनी आठव्या गडयासाठी 119 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. पीवायसीकडून प्रीतम पाटीलने 48धावात 3 गडी, तर यश मानेने 17 धावात 3 गडी, रोहन दामले(41-2), दिव्यांग हिंगणेकर(47-2)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून पूना क्लबला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना पीवायसी संघाने आज दिवसअखेर 22 षटकात 4बाद 106धावा केल्या. यात अभिषेक परमारने 89 चेंडूत नाबाद 54धावा, दिव्यांग हिंगणेकरने 22धावा, रोहन दामलेने 12धावा केल्या.पीवायसी संघाचा 18 षटकांचा खेळ अजून बाकी असून ते 107 धावांनी पिछाडीवर आहेत. अभिषेक परमार नाबाद 54 धावांवर, तर साहिल मदन नाबाद 7 धावांवर खेळत आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 30.3षटकात सर्वबाद 116धावा(166-50धावा)(देवदत्त नातू 49(63,7×4), निकित धुमाळ 26(44), यश क्षीरसागर 25(40), नौशाद शेख 23(18), गणेश गायकवाड 4.3-20-3, सिद्देश वरगंटी 6-30-2, हर्षद खडीवाले 4-23-2, इझान सय्यद 6-45-2) वि.केडन्स: 35 षटकात 5बाद 183धावा(निखिल पराडकर 57(82,4×4) गणेश गायकवाड नाबाद 57(86,6×4), अथर्व धर्माधिकारी 20, हर्षद खडीवाले 14, अजित गव्हाणे नाबाद 0, नौशाद शेख 6-30-2, निकित धुमाळ 6-26-1, प्रज्वल गुंड 5-14-1, यश क्षीरसागर 6-33-1);

पूना क्लब: 38.3षटकात सर्वबाद 163धावा(213-50धावा)(ऋषिकेश मोटकर 84(107,11×4), विश्वराज शिंदे 48(77,8×4), यश नाहर 30(34), प्रीतम पाटील 6-48-3, यश माने 3.3-17-3, रोहन दामले 8-41-2, दिव्यांग हिंगणेकर 7-47-2) वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 22 षटकात 4बाद 106धावा(अभिषेक परमार नाबाद 54(89,6×4,1×6), दिव्यांग हिंगणेकर 22, रोहन दामले 12, साहिल मदन नाबाद 7, आशिष सूर्यवंशी 6-24-1, दर्शन लुंकड 4-19-1, विश्वराज शिंदे 2-6-1);