आशियाई क्रीडा स्पर्धेतील अंकिता रैना, ऋतुजा भोसले, शिरीन लिमये या खेळाडूंचा सत्कार

पुणे । क्रीडा क्षेत्रात शहरांतील अग्रगण्य क्लब असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने इंडोनेशिया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या टेनिसमधील कांस्य पदक विजेती अंकिता रैना, टेनिसपटू ऋतुजा भोसले आणि बास्केटबॉलपटू शिरीन लिमये या तीन खेळाडूंचा राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी तीन खेळाडूंसह प्रशिक्षक हेमंत बेंद्रे, सुवर्णा लिमये, टेक्निकल ऑफिशियल अवनी गोसावी आणि खेळाडूंचे पालक यांचा पीवायसी क्लबच्या सभासदांतर्फे क्लबचे मानद सचिव कुमार ताम्हाणे, खजिनदार आनंद परांजपे, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि पीएमडीटीएचे अभिषेक ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक विजेती टेनिसपटू अंकिता रैनाला क्लबच्या वतीने पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले. याआधी क्लबचे सभासदत्व प्रदान करण्यात आलेल्या भारतीय खेळाडू गगन नारंग, पूल्लेला गोपचंद, सायना नेहवाल, पंकज अडवाणी यांच्या यादीत अंकिता रैनाचा समावेश झाला आहे.

पीवायसी क्लबचे मानद सचिव कुमार ताम्हाणे म्हणाले कि, पीवायसी क्लबला आपल्या क्रीडा संस्कृतीचा अतिशय अभिमान आहे आशियाई स्पर्धेत या क्लबचे तीन खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत असून हा मान मिळविणारा पीवायसी हा एकमेव क्लब आहे.

कोरियातील गेल्या आशियाई स्पर्धेतही पीवायसीच्या तीन खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते. खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देऊन असे भविष्यात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ते पुढे म्हणाले कि, भविष्यात आगामी होणाऱ्या ऑलंपिक स्पर्धेत या खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करावे आणि यासाठी क्लबतर्फे आवश्यक ती मदत या खेळाडूंना करण्यात येईल, असे आम्ही आश्वासन देतो.

सत्काराला उत्तर देताना अंकिता रैना म्हणाली कि, या क्लबच्या पाठिंब्यामुळे मी भारावून गेले आहे. मला गरज भासल्यास पीवायसीने पाहाटे 4.30वाजताची क्लबचे दरवाजे माझ्यासाठी खुले केले आहेत.

आपल्या देशात खेळाडूंसाठी असे प्रयत्न करणारे फारच कमी क्लब आहेत.हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली 10वर्षाची असल्यापासून मी प्रशिक्षण घेत आहे आणि पीवायसी क्लब हे माझे दुसरे घरच बनले आहे.

शिरीन लिमये हि क्लबमध्ये प्रशिक्षक व तिची आई सुवर्णा लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. अंकिता सोबत टेनिस खेळत असलेल्या ऋतुजा भोसले हिने मिळालेल्या पाठिंब्याबद्दल क्लबचे आणि सर्व सभासदांचे आभार मानले.

यावेळी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, खेळाच्या पाठिंब्यासह पीवायसी हिंदू जिमखानासारख्या क्लबने सर्व खेळाडूंना सर्वोतोपरी पाठिंबा दिला आहे. हि परंपरा कायम ठेवल्यास भारत अधिकाधिक पदके मिळवेन. अभिषेक ताम्हाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

 ५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले

 अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील

 तिसरी कसोटी: खराब सुरुवातीनंतर सॅम करनने इंग्लंडला सावरले

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक