पीवायसी करंडक 14 वर्षाखालील  निमंत्रित  क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा मोठा विजय 

पुणे:– पीवायसी हिंदु  जिमखाना क्लब यांच्या  तर्फे  पीवायसी करंडक 14वर्षाखालील   निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत  पीवीयसी हिंदू जिमखाना  संघाने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत  क्लब ऑफ महाराष्ट्र   संघाचा  10 गडी राखून पराभव करत स्पर्धेत मोठा विजय मिळवाल.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आपल्या विजयी मालिकेत सातत्य राखत क्लब ऑफ महाराष्ट्र   संघाचा सर्व 10 गडी राखून दणदणीत पराभव केला.

पहिल्यांदा खेळताना कुश पाटीलच्या आक्रमक व अचूक गोलंदाजीपुढे क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 44.3 षटकात सर्वबाद 173 धावांत गारद झाला. यात विवेक टिपरेने 43 तर साहिल कडने 40 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.

कुश पाटीलने केवळ 25 धावा देत 5 गडी बाद करून क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव खिळखीळा केला. 173 धावांचे लक्ष समर्थ काळभोरच्या 78 व सुफियान सय्यदच्या 60 धावांसह पीवायसी हिंदू जिमखाना संघाने एकही गडी न गमावता केवळ 37.1 षटकात 174 धावा करून सहज पुर्ण केले. 25 धावांत 5 गडी बाद करणारा कुश पाटील सामनावीर ठरला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी 

क्लब ऑफ महाराष्ट्र – 44.3 षटकात सर्वबाद 173 धावा(विवेक टिपरे 43, साहिल कड 40, प्रणव केळकर 31, कुश पाटील 5-25, निखिल लुणावत 1-39, प्रणित अठवले 1-14, सुफियान सय्यद 1-11) पराभूत वि पीवायसी हिंदू जिमखाना- 37.1 षटकात बिनाबाद 174 धावा(समर्थ काळभोर 78(109), सुफियान सय्यद 60(114)) सामनावीर- कुश पाटील

पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 10 गडी राखून सामना जिंकला.