हे दोन क्रिकेटपटू खेळू शकतात काउंटी क्रिकेट !

सध्या गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेले भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि आर अश्विन येत्या काळात काउंटी क्रिकेट खेळू शकतात.

क्रिकइन्फो वेबसाईटवरील एका रिपोर्टप्रमाणे आर अश्विन हा एक आदर्श खेळाडू आहे जो वूस्टरशायरकडून क्रिकेट खेळू शकतो. याच संघाचे डायरेक्टर असणारे स्टिव्ह र्होडस यांनी रवींद्र जडेजासुद्धा खेळण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती दिली. अन्य दिग्गज देशाचे खेळाडूही येथे क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असल्याचं समजत.

यापूर्वी भारताचे अनेक दिग्गज खेळाडू काउंटी क्रिकेट खेळले आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.

भारताचा श्रीलंका दौरा ६ सप्टेंबर रोजी संपत असून जर भारतीय खेळाडू काउंटी क्रिकेटमध्ये सहभागी झाले तर त्यांना शेवटच्या तीन फेऱ्यात भाग घेता येईल.

भूतकाळात भारतीय खेळाडूंना बीसीसीयने या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यास नकार दिला होता. २०१६च्या इंग्लंड दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीने काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.