अश्विनच्या पत्नीने सांगितला त्यांच्या लग्नानंतरचा एक गमतीशीर किस्सा !

भारतीय संघातील फिरकी गोलंदाज आर अश्विनने काल त्याच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला. याबद्दल त्याची पत्नी प्रीतीने त्यांच्या लग्नानंतर झालेला एक गमतीशीर किस्सा सोशल मीडियावरून सांगितला आहे.

तिने ट्विट केले आहे ” ६ वर्षांपूर्वी या दिवशी आमचे लग्न झाले आणि आम्ही त्या दिवशी कोलकत्ताला गेलो. मला माझ्या कुटुंबाने सल्ला दिला होता की अश्विनचा उद्या सामना आहे त्याला झोपू दे. पण भारतीय संघाने गजर लावून ते लपवून ठेवले होते जे रात्रभर वाजत होते. पण बरे झाले की भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली.”

“त्या दिवशी मी पहिल्यांदा कसोटी सामना बघत होते. मी खूप नर्व्हस आणि उत्साही होते. तेव्हा माझ्यासाठी पहिला अयशस्वी क्षण तो होता जेव्हा मला कळल की मी अश्विनला मैदानावर ओळखू शकत नाही आणि आता त्याच्या नावावर ३०० बळी आहेत.” याबरोबरच तिने त्यांच्या लग्नातील एक फोटो पोस्ट केला आहे.

आश्विननेही ट्विटर वरून त्याच्या पत्नीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तो १६ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कोलकत्तामध्ये आहे. भारतीय संघाचा पहिला कसोटी सामना कोलकत्तामध्ये होणार आहे.