राजस्थान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर आर अश्विनने केला भांगडा, पहा व्हिडिओ

मोहाली। मंगळवारी(16 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये 32 वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. आयएस बिंद्रा स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने 12 धावांनी विजय मिळवला.

पंजाबच्या या विजयात त्यांचा कर्णधार आर अश्विनने मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 24 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजी करताना 4 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 17 धावा केल्या आणि पंजाबला 20 षटकात 182 धावसंख्या गाठून दिली. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

या कामगिरी नंतर खूश असलेला अश्विन सामना संपल्यावर ढोलच्या तालावर भांगडा नृत्य करतानाही दिसला. याचा व्हिडिओ किंग्स इलेव्हन पंजाबने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अश्विनबरोबरच बॉलिवूड अभिनेता सोनू सुदही दिसत आहे. तसेच अश्विनच्या आजूबाजूला काहीजण ढोल वाजवत आहेत. अश्विनने काही क्षण भांगडा केल्यानंतर ढोल वाजवणाऱ्या एकाने अश्विनला ढोलवर बसवले. ते पाहुन अश्विनला हसू आणि आनंद आवरता आला नाही.

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थान समोर 183 धावांचे आव्हान ठेवले होते. पंजाबकडून केएल राहुलने 47 चेंडून 52 धावांची खेळी केली. तसेच मिलरने 40 धावांची आक्रमक खेळी केली.

183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानकडून राहुल त्रिपाठीने 50 धावांची खेळी केली. पण त्याला राजस्थानला विजय मिळवून देता आला नाही. राजस्थानला 20 षटकात 7 बाद 170 धावाच करता आल्या.

गोलंदाजीत राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर इश सोधी, धवल कुलकर्णी आणि जयदेव उनाडकटने प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर पंजाबकडून अश्विनसह अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आणि मुरुगन अश्विनने 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

एमएस धोनी असताना मी प्रथमोपचार पेटी सारखा आहे – दिनेश कार्तिक

विश्वचषकासाठी संघात निवड न झाल्याने रायडूने ट्विटरवरुन दिली अशी प्रतिक्रिया

आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा डिविलियर्स दुसराच क्रिकेटपटू