अायपीएलमधील गंमत अश्विनला पडू शकते भारी, गमावू शकतो टीम इंडियातील स्थान

मुंबई | भारतीय संघातील स्टार गोलंदाज आर अश्विन भारतीय कसोटी संघातील आपले स्थान गमावू शकतो. यापाठीमागे त्याने देशांतर्गत क्रिकेट तसेच आय़पीएलमध्ये केलेली लेग स्पिन गोलंदाजी आहे. 

हा खेळाडू २०१७-१८ या देशांतर्गत क्रिकेटच्या मोसमात सतत लेग स्पिन तसेच अाॅफ स्पिन गोलंदाजी करताना दिसला तर अायपीएलच्या या मोसमात तो जास्त करून लेग स्पिन गोलंदाजी करताना दिसत आहे. 

यामुळे के. श्रीकांत, कपिल देव तसेच अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. 

अश्विनच्या खांद्याला तसेच बोटांना आॅफ स्पिन गोलंदाजीची सवय लागली आहे. त्यामूळे अचानक एवढे मोठे बदल करणे त्याला महागात पडू शकते असा सुर माजी क्रिकेटपटूंनी लावला आहे. 

हा खेळाडू मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून आधीच आपले स्थान गमावून बसला आहे. तो जर यापुढे क्रिकेट गांभिर्याने घेणार नसेल तर त्याला कसोटीतीलही स्थान गमवावे लागले. 

भारतीय संघ अायपीएल नंतर इंग्लंडचा दौरा करणार आहे. त्यापुर्वी अश्विनला चांगली कामगिरी करावीच लागेल. 

अश्विनची कामगिरी ही अाशिया खंडात उत्तम राहिली आहे. परंतू त्याला अाशियाबाहेर विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामूळे या दौऱ्यात जर त्याची निवड झाली तर त्याला चांगली कामगिरी करावीच लागेल.