किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विनसाठी ही आहे सर्वात वाईट बातमी!

भारताचा फिरकीपटू आर अश्विनने 2018 आणि 2019 च्या आयपीएल मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले आहे. पण आता त्याला 2020 च्या आयपीएल मोसमात त्याचे हे कर्णधारपद गमवावे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंजाब संघ त्याची साथही सोडण्याचे वृत्त आले आहे.

मिररने दिलेल्या वृत्तानुसार पंजाब संघ अश्विनचे प्लेअर ट्रान्सफरमध्ये ट्रेडींग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघांशी चर्चा करत आहेत.

अश्विनला पंजाबने 2018 मध्ये आयपीएल लिलावात 7.8 कोटी रुपयांची बोली लावत संघात सामील करुन घेतले होते. तसेच याच मोसमात त्यांनी त्याला कर्णधारपदाची जबाबदारीही दिली होती. पण अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबला 2018 आणि 2019 या मोसमात मोठे यश मिळवण्यात अपयश आले.

अश्विनने पंजाबसाठी 2018 आणि 2019 या दोन मोसमात मिळून 28 सामने खेळले. यामध्ये त्याने 25 विकेट्स घेतल्या. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब संघ 2018 आणि 2019 मोसमात गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिला.

आयपीएल 2020 साठी अश्विनला जरी दिल्ली किंवा राजस्थानने संघात घेतले तरी अश्विनला पुन्हा कर्णधारपद मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण दिल्लीचे कर्णधारपद श्रेयस अय्यर सांभाळत आहे. तर राजस्थानचे कर्णधारपद अजिंक्य रहाणे किंवा स्टिव्ह स्मिथलाच मिळण्याची जास्त संधी आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकत रचला इतिहास

भारताविरुद्ध तब्बल ९५ मिनिटे फलंदाजी करुनही शून्यावर बाद झाला कमिन्स, केला नकोसा विक्रम

विंडीज विरुद्ध तिसऱ्या दिवशी काळी पट्टी बांधून मैदानात उतरला भारतीय संघ, जाणून घ्या कारण