रवी शास्त्रीबद्दल प्रश्न विचारताच अश्विनने धारण केले मौनव्रत!

भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विनला जेव्हा नवनियुक्त प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने यावर कोणतेही उत्तर दिले नाही. त्याच्या ह्या कृतीला दुजोरा देताना अश्विनने हा प्रश्न त्याच्याशी निगडित नसल्याचं सांगितलं.

अश्विन म्हणाला, ” मी यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. कारण हा प्रशिक्षक आणि त्याच्या सपोर्ट स्टाफशी निगडित बाबींचा माझ्याशी काहीही संबंध नाही . मी अशा गोष्टीवर भाष्य करण हे चुकीचं ठरेल.”

रवी शास्त्री टीम डायरेक्टर असताना अश्विनची कारकीर्द खऱ्या अर्थाने फुलली. २०१४-२०१६ या काळात अश्विनने श्रीलंका, दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती.

२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात अश्विनची निवड झाली आहे.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार) , के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), रोहीत शर्मा, रविचंद्रन आश्विन, वृद्धिमान सहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दीक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, शिखर धवन

संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना २६ ते ३० जुलै गॅले
दुसरा कसोटी सामना ३ ते ७ ऑगस्ट कोलंबो
तिसरा कसोटी सामना १२ ते १६ ऑगस्ट कॅंडी

पहिला एकदिवसीय सामना २० ऑगस्ट डॅबुल्ला
दुसरा एकदिवसीय सामना २४ ऑगस्ट कॅंडी
तिसरा एकदिवसीय सामना २७ ऑगस्ट कॅंडी
चौथा एकदिवसीय सामना ३१ ऑगस्ट कोलंबो
पाचवा एकदिवसीय सामना ३ सप्टेंबर कोलंबो

एकमेव टी-२० सामना ६ सप्टेंबर कोलंबो