आर अश्विनने टाकलेल्या या चेंडूचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल, पहा व्हिडिओ

भारताचा फिरकीपटू आर अश्विन नेहमीच त्याच्या गोलंदाजीतील विविधतेमुळे ओळखला जातो. पण सध्या सुरु असलेल्या तमिळनाडू प्रीमीयर लीगमध्ये पहिल्याच सामन्यात अश्विनची गोलंदाजीची अनोखीच शैली सर्वांना पहायला मिळाली आहे.

या स्पर्धेतील पहिला सामना दिन्ग्दुल ड्रॅगन्स विरुद्ध चेपॉक सुपर जाइल्स संघात पार पडला. या सामन्यात दिन्ग्दुल ड्रॅगन्सकडून खेळताना अश्विन एका हाताने गोलंदाजी करताना दिसून आला आहे. त्याच्या या गोलंदाजी शैलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अश्विनने या सामन्यात अष्टपैलू खेळ करताना संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. दिन्ग्दुल ड्रॅगन्सने या सामन्यात 10 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात शेवटच्या षटकात चेपॉक संघाला विजयासाठी 17 धावांची गरज होती. हे षटक दिन्ग्दुल ड्रॅगन्सकडून अश्विनने टाकले. या षटकातील पाचवा चेंडू अश्विनने अधूऱ्या ऍक्शनने टाकला. त्याने डाव्या पायाने रनअप संपवत एक हात न हालवता एकाच हाताने हा चेंडू टाकला. हा चेंडूपाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

अश्विनला या सामन्यात गोलंदाजी करताना विकेट घेता आली नाही. पण त्याने फलंदाजांना धावा घेण्यापासून रोखून ठेवले होते. त्याने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 24 धावा दिल्या. याबरोबरच त्याने फलंदाजी करतानाही त्याचे महत्त्वाचे योगदान दिले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिन्ग्दुल ड्रॅगन्स संघाकडून अश्विन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्याने 19 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 37 धावा केल्या. दिन्ग्दुल ड्रॅगन्सच्या डावातील अश्विनची सर्वोच्च खेळी ठरली.

दिन्ग्दुल ड्रॅगन्सला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 115 धावाच करता आल्या. चेपॉककडून आर ऍलेक्झॅन्डरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 116 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेपॉक संघाला 20 षटकात 9 बाद 105 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून आरिफ आणि मुरुगन अश्विनने प्रत्येकी 16 धावा केल्या. या चेपॉककडून केलेली सर्वोच्च धावांच्या खेळी ठरल्या. दिन्ग्दुल ड्रॅगन्सकडून एम सिलाबारासनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

वाढदिवस विशेष: विचित्र शैलीचा मोहंती

एमएस धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही, त्याऐवजी करणार हे काम

विंडीज दौऱ्यासाठी या दिवशी होणार टीम इंडियाची निवड