जर्मन संघात वंशभेद होत नाही- थॉमस मुलेर

बायर्न म्युनिच आणि जर्मन फुटबॉलपटू थॉमस मुलेरने खेळात आणि जर्मन राष्ट्रीय संघात वंशभेद होत असल्याची माहिती खोटी असल्याचे सांगितले. मिडियाच अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहे, अशी टीकाही त्याने केली.

रविवारी म्युनिचचा मॅंचेस्टर युनायटेड विरुध्द मैत्रीपुर्ण सामना असल्याने यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मुलेरने ओझिलवर आरोप करण्यापुर्वी मिडियाला याचे आरोपी केले.

ही पुर्ण चर्चा बाहेरून होत असून याला राजकारणही कारणीभुत आहे, असे मुलेर म्हणाला.

“आता हे प्रकरण येथेच संपवून फुटबॉलवर लक्ष केंद्रित करावे. जर्मनी फुटबॉल महासंघाला सध्या हे प्रकरण येथेच थांबवायचे आहे पण मिडिया पुन्हा ते वर आणत आहे “,असेही तो पुढे म्हणाला.

मेसट ओझिलने जर्मन फुटबॉल महासंघाच्या वंशभेदाला कंटाळून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर प्रथमच तो इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये खेळताना अर्सेनलचे नेतृत्व केले.

मात्र जर्मनी फुटबॉल महासंघाने मेसट ओझीलचे हे आरोप फेटाळत या प्रकरणाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

“मेसट ओझीलने याप्रकारे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली याचे आम्हाला दुख: आहे. मात्र ओझीलने जर्मनी फुटबॉल महासंघावर केलेल्या आरोपांचे आम्ही समर्थन करत नाही. तसेच आम्ही ओझीलचा वंशभेदाच्या टीकेपासून बचाव केली नाही, असे ओझीलचे म्हणने चुकीचे आहे.” जर्मनी फुटबॉल महासंघाने मेसट ओझीलच्या आरोपांना या शब्दात उत्तर दिले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

सॅम्पडोरीयाने केले रोनाल्डोला करारबद्ध

अनोखी कहानी- क्रीडा क्षेत्रात असेही करियर करता येते