बॅडमिंटन लीग २०१८ चे जेतेपदाचे रॅडिसन मानकरी

पुणे।’महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम ए रंगूनवाला इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ आयोजित ‘एम ए रंगूनवाला बॅडमिंटन लीग २०१८ ‘ चा समारोप झाला.

‘रॅडिसन (खराडी) हे ‘बॅडमिंटन लीग २०१८’ चे जेते पदाचे मानकरी ठरले.

दिव्या अनंथरामन (‘हॉलिडे इन एक्सप्रेस हॉटेल्स’चे महाव्यवस्थापक) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.

या तीन दिवसीय स्पर्धेत पुरुष दुहेरी स्पर्धा, महिला एकेरी, पुरुष एकेरी, अध्यापकवर्ग सदस्य आणि विभाग प्रमुख स्पर्धा संपन्न झाल्या.

.स्पर्धेमध्ये पुरुषांची दुहेरी स्पर्धा ‘रॅडिसन खराडी’, महिला एकेरी -शेरेटन, पुरुष एकेरी -एम ए रंगूनवाला इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च’, अध्यापकवर्ग सदस्य आणि विभाग प्रमुख स्पर्धा -आयबीआयएस पुणे विमान नगर हे विजयी झाले आहेत.

एम. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी .ए. इनामदार आणि प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

स्पर्धेचे उदघाटन राज्य स्तरीय बॅडमिंटन पटू सुधांशु मेडसीकर यांच्या हस्ते झाले होते.

या स्पर्धेत पुण्यातील एकूण १२ संघानी भाग घेतला होता. ही स्पर्धा आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे पार पडली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारताच्या या माजी खेळाडूंनी केला महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज

मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने लॉर्ड्सवरील घंटा वाजवल्यानंतर होणार भारत-इंग्लंड कसोटी सामन्याला सुरुवात

टॉप ५: इंग्लंड विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात या विक्रमांकडे असेल लक्ष