नदाल-फेडररमध्ये कोण आहे कमबॅक किंग?

मुंबई | टेनिस विश्वात राॅजर फेडरर आणि नदाल यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. कधी कधी तर टेनिस विश्व हे या दोन खेळाडूंमध्येच विभागले गेले आहे की काय असे वाटते. 

अशा या दोन खेळाडूंमध्ये पहिल्या सेटमध्ये पराभूत झाल्यावर सामना जिंकण्यात नदाल सरस ठरला आहे. २४७ सामन्यात नदाल जेव्हा जेव्हा पहिला सेट पराभूत झाला आहे तेव्हा १०५ सामन्यात त्याने विजय मिळवला आहे तर १४२ सामन्यात तो पराभूत झाला आहे. म्हणजेच तो तब्बल ४२.५% वेळा कमबॅक करत जिंकला आहे. 

राॅजर फेडरर असे सामने जरी नदालपेक्षा जास्त जिंकला असला तरी त्याचे हे % नदालपेक्षा कमी आहे. फेडरर ३०५ सामन्यात पहिला सेटमध्ये पराभूत झाल्यावर १२६ सामने जिंकला असून १७९ सामने पराभूत झाला आहेय त्याचे हे % ४१% आहे. 

गेल्या एक वर्षात मात्र पहिला सेट हरल्यानंतर फेडररने ११ पैकी ८ सामन्यात विजय मिळवला आहे.