नदालने फ्रेंच ओपन विजयासहित हे रेकॉर्डस् आपल्या नावावर केले

काल विक्रमी १० फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या नदालने आज एटीपी क्रमवारीत पुन्हा दुसरे स्थान मिळविले. २००५-२०१७ या १३ वर्षांच्या प्रवासात नदालने बऱ्याच गोष्टी मिळविल्या. परंतु तरीही आजपर्यंतच्या सर्व विजयात कालचा विजय खास असण्याचं कारण म्हणजे गेले तीन वर्ष नदालचा हरवलेला फॉर्म आणि दुखापती. नदाल ज्या गोष्टीसाठी विशेष ओळखला जातो ती म्हणजे किंग ऑफ क्ले कोर्ट. परंतु गेले २-३ वर्ष त्यावरही विशेष कामगिरी होत नव्हती. म्हणून हे विजेतेपद खास.

हे विजेतेपद जिंकताना नदालने बरेच विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यातील काही

#१ नदाल संपूर्ण स्पर्धेत एकही सेट हरला नाही. अशी कामगिरी त्याने यापूर्वी ह्याच स्पर्धेत २००८ आणि २०१० साली केली होती.

#२ नदाल संपूर्ण स्पर्धेत फक्त ३५ गेम्स हरला. यापूर्वी एवढ्या कमी गेम्स हारून जिंकण्याची कामगिरी १९७८ साली बियॉं बोर्ग यांनी १९७८ साली केली होती. तेव्हा ते ३२ गेम्समध्ये फक्त पराभूत झाले होते.

#३ ओपन इरा मध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम एकाच स्पर्धेत जिंकण्याचा विक्रम नदालच्या नावावर झाला. कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने ओपन इरा मध्ये एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत एवढी विजेतेपद मिळवली नाहीत. मार्गारेट कोर्ट यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जरी ११ विजेतेपद मिळविली असली तरी त्यातील काही ओपन इरा पूर्वीची आहेत.

#४ या विजयाबरोबर सर्वाधिक पुरुष एकेरीची ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नदाल दुसऱ्या स्थानी आला. त्याने पिट सम्प्रास यांना मागे टाकले असून सम्प्रास यांच्या नावावर १४ ग्रँडस्लॅम पदक आहेत. तर नदाल पुढे दिग्गज टेनिसपटू आणि गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम ) म्हणून ओळखला जाणारा रॉजर फेडरर १८ विजेतेपदासह आहे.

#५ नदालच फ्रेंच ओपन मधील रेकॉर्ड आहे ७९-२ म्हणजेच ७९ विजय आणि २ पराभव. हे दोन पराभव २००९ साली सोडोर्लीन विरुद्ध तर २०१५ साली नोवाक जोकोविच विरुद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे सॉडर्लिंग त्या वेळी अंतिम फेरीत फेडररकडून पराभूत झाला होता तर जोकोविचला त्याचे पहिलेवहिले आणि एकमेव फ्रेंच ओपन जिंकता आले होते.

#६ संपूर्ण स्पर्धेत नदाल जेवढे गेम्स खेळाला त्यापेक्षा ३२ जास्त गेम्स २०१० विम्बल्डन स्पर्धेत जॉन इसनेर आणि निकोलस माहूत यांनी एकाच सामन्यात खेळले होते.