फ्रेंच ओपन २०१८: राफेल नदाल विरुद्ध डॉमिनिक थिममध्ये रंगणार अंतिम फेरीचा थरार

फ्रेंच ओपनमध्ये आज क्ले कोर्ट किंग राफेल नदाल विरुद्ध डॉमिनिक थिममध्ये पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे.

अव्वल मानांकित नादालने उपांत्य फेरीत जुआन डेल पोट्रोचा 6-4,6-1,6-2 अशा फरकाने पराभव करून कारकिर्दीतील 24 वी ग्रॅंडस्लॅमची अंतिम फेरी गाठली आहे. (11 फ्रेंच ओपन, 5- विंबल्डन 4- आॅस्ट्रेलियन ओपन 4- युएस ओपन) तसेच यात त्याने 11 व्यांदा फ्रेंच ओपेनची अंतिम फेरी गाठली आहे.

त्याने आत्तापर्यंत फ्रेंच ओपेनची 10 विजेतीपदके मिळवली असून, तो एकदाही फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत झाला नाही. त्यामुळे तो हा इतिहास कायम ठेवण्याचा आज प्रयन्त करेल.

पण त्याचबरोबर क्ले कोर्ट किंग म्हटले जाणाऱ्या नदालला केवळ त्याचा आजचा प्रतिस्पर्धी डॉमिनिक थिएम गेल्या दोन वर्षांत क्ले कोर्टवर पराभूत केले आहे. त्यामुळे यावेळेसही थिमचा हा प्रयत्न असेल असेल.

24 वर्षीय थिमने फ्रेंच ओपन 2018 च्या उपांत्य फेरीत इटलीच्या मार्को चेक्कीनाटोचा 5-7,6-7(10-12),1-6 असा सरळ सेट मध्ये पराभूत करत कारकिर्दीतील पहिलीच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

नदाल आणि थिम आत्तापर्यंत 9 वेळा आमने सामने आले आहेत. विशेष म्हणजे नऊही वेळा ते क्ले कोर्टवर एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यात नादालने 6 वेळा तर थिएमने 3 वेळा बाजी मारली आहे.

त्यामुळे आज नदाल त्याच्या कारकिर्दीतील 17 वे ग्रँडस्लॅम जिंकतो की फ्रेंच ओपनला पुरुष एकेरीचा नवा विजेता मिळतो हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

क्रिकेटवरील “मुंबई क्रिकेट सफरनामा ” लेखमालिकेतील काही खास लेख-

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण

– मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट

वाचा-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज