राफेल नदाल विरुद्ध नोवाक जोकोविच पुन्हा आमने-सामने

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणारा टेनिसपटू राफेल नदालने 14 ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या नोवाक जोकोविच विरुद्ध सौदी अरेबियात होणारा प्रदर्शनीय सामना खेळण्यास होकार दिला आहे.

हा सामना जेदनाह किंग अब्दुल्लाह स्पोर्ट सिटी येथे 22 डिसेंबरला खेळला जाणार आहे.

“मला आंमत्रित केल्याबद्दल धन्यवाद आणि पहिल्यांदाच तेथे खेळणार असून मी उत्सुक आहे.” असे नदालने ट्विटरवर म्हटले.

2018 फ्रेंच ओपन चॅम्पियन नदालने त्याच्या कारकिर्दीत एकूण 17 ग्रॅंड स्लॅम जिंकले आहेत. तर जोकोविच सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने यावर्षी विम्बल्डन आणि युएस ओपनचे विजेतेपद पटकावले आहेत.

नदाल आणि जोकोविच हे दोघे 52 वेळा आमने-सामने आले असून सर्बियन स्टार जोकोविच 27 सामने जिंकत आघाडीवर आहे.

तसेच ताज्या एटीपी क्रमवारीत नदाल हा पहिल्या क्रमांकावर कायम असून रॉजर फेडरर आणि जोकोविच अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

सौदी अरेबियाने मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध खेळाच्या स्पर्धा आयोजित करत आहेत.

येथे जानेवारीत पहिली महिला व्यावसायिक स्क्वॅश स्पर्धा खेळली गेली तर मागील महिन्यातच ब्रिटनचा कॅलम स्मिथने येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएन स्पर्धेत सहभाग घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

या पुरस्काराच्या यादीत क्रिस्तियानोचे नाव पुढे, मेस्सी पहिल्या १५ मध्येही नाही

पृथ्वी शॉ पाठोपाठ हा युवा खेळाडूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार

PBL 2018: प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये भारतीय खेळाडू मालामाल