शांघाय ओपन: नदाल, फेडरर तिसऱ्या फेरीत

शांघाय| यावर्षीच्या टेनिसमध्ये आपला पूर्वीचा दबदबा राखून ठेवणारे दिग्गज टेनिस खेळाडू राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी शांघाय ओपन स्पर्धेतील आपली घोडदौड कायम ठेवली आहे.

नदालने नुकतीच चायना ओपन स्पर्धा जिंकली आहे. ती स्पर्धा पूर्ण करून लगेचच नदाल शांघाय ओपन स्पर्धेसाठी दाखल झाला होता. त्याला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. त्यामुळे त्याने त्याचा दुसरा फेरीतील सामना काल जॅरेड डोनाल्डसन विरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने निर्विवाद वर्चस्व राखून हा सामना ६-२, ६-१ असा जिंकला आहे.

याचबरोबर यावर्षीचा विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन विजेता रॉजर फेडरर हा सुद्धा ह्या स्पर्धेत उतरला आहे. नदालप्रमाणेच त्यालाही पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. त्यानेही काल झालेल्या त्याच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात दिएगो श्वार्ट्झमन विरुद्ध विजय मिळवला.

पहिल्या सेटमध्ये त्याला श्वार्ट्झमनने झुंजवले परंतु फेडररने आपला अनुभवाच्या जोरावर हा सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र त्याने श्वार्ट्झमनला संधी न देता सामना ६-७, ४-६ असा जिंकला. फेडररचा हा या वर्षातील ४० वा विजयी सामना होता

यानंतरचे तिसऱ्या फेरीतील त्यांचे सामने नदाल विरुद्ध फॅबिओ फॉगनिनी असा तर रॉजर फेडरर विरुद्ध अलेक्सन्डर डॉगोपोलोव, असे आज रंगातील.