- Advertisement -

अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं

0 63

राफेल नदालने २००५ साली पहिल्यांदाच फ्रेंच ओपन स्पर्धेत भाग घेतला आणि विशेष म्हणजे १९ वर्षीय नदाल ती स्पर्धा जिंकलाही. फ्रेंच ओपन पहिल्याच वेळी खेळत असताना ती जिंकण्याची कामगिरी करणारा तो केवळ दुसरा खेळाडू आहे.

आज २०१७ साली त्याने विक्रमी १३ वर्षांत १०व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. १३ वर्षात ३ पराभव आणि १० विजेतेपद अशी मोठी कामगिरी नदालने केली. २००९, २०१५ आणि २०१६ या वर्षी या महान खेळाडूला फ्रेंच ओपनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. २०१५ आणि २०१६ वर्षातील पराभव हा दुखापत आणि फॉर्म यामुळे झाला असला तरी २००९ साली नदालला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.

२००५ ते २०१७ या १३ वर्षांत नदालने केलेल्या फ्रेंच ओपनमधील कामगिरीचा हा थोडक्यात आढावा…

 

Screenshot 13 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२००५: १९ वर्षीय नदालने प्रथमच फ्रेंच ओपन जिंकली. 

 

Screenshot 25 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२००६ साली पुन्हा ही स्पर्धा जिंकून ह्या खेळाडूने जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.

 

Screenshot 15 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२००७ साली २० वर्षीय नदालने फ्रेंच ओपन जिंकून क्ले कोर्ट किंग ही उपाधी मिळविली.

 

Screenshot 16 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२००८ बियॉन बोर्गच्या सलग ४वेळा फ्रेंच ओपन जिंकायच्या रेकॉर्डशी बरोबरी

 

Screenshot 17 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२००९ या वर्षी सॉडर्लिंग चौथ्या फेरीत पराभूत, रॉजर फेडररने याच वर्षी फ्रेंच ओपन जिंकून करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले.

 

 

Screenshot 18 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२०१०: २००९ मधील पराभवाचा वचपा काढत सॉडर्लिंगला अंतिम सामन्यात पराभूत करत ५व्यांदा फ्रेंच ओपन जिंकले

 

Screenshot 19 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२०११: संपूर्ण मोसमात नदाल जागतिक क्रमवारीत पहिला राहिला आणि फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत रॉजर फेडररला पराभूत केले.

 

Screenshot 20 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२०१२: जोकोविचला अंतिम फेरीत पराभूत करून फ्रेंच ओपनचे विक्रमी ७व्यांदा विजेतेपद मिळविले. बियॉं बोर्ग यांचा विक्रम मोडला.

 

Screenshot 21 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२०१३: ही फायनल स्पेनच्याच डेविड फेरर आणि नदालमध्ये झाली. नदाल प्रथमच शॉर्ट शॉर्ट्स घालून ह्या स्पर्धेत खेळाला आणि सरळ सेट मध्ये विजय मिळवत विक्रमी आठव्यांदा विजेतेपद जिंकले.

 

Screenshot 22 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२०१४: संपूर्ण मोसम खराब गेलेल्या नदालने अंतिम फेरीत जोकोविच दुसऱ्यांदा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत विजय मिळवीत पिट सम्प्रास यांच्या विक्रमी १४ ग्रँडस्लॅम विजेतेपदाची बरोबरी केली.

 

Screenshot 23 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२०१५: या वर्षी नदाल प्रथमच २००५ नंतर टॉप ५ मधून बाहेर. जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत नदालला पराभूत केले. नदाल दुसऱ्यांदा फ्रेंच ओपनमध्ये हरला. या वर्षी स्टॅन वावरिंका फ्रेंच ओपन जिंकला.

 

Screenshot 24 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२०१६: दुखापत आणि हरवलेला फॉर्म यामुळे तिसऱ्याच फेरीतून बाहेर. तरीही ग्रँडस्लॅम स्पर्धांत २०० विजेतेपद जिंकणारा केवळ आठवा खेळाडू. ह्या वर्षी फ्रेंच ओपन नोवाक जोकोविचने जिंकून करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले.

 

Screenshot 11 1 - अल्बम: नदालची १० फ्रेंच ओपन विजेतेपदं
२०१७: २०१५च्या फ्रेंच ओपन विजेत्या स्टॅन वावरिंकाला पराभूत करत २०१४च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा काढला. विक्रमी १०व्यांदा फ्रेंच ओपन जिंकला. टेनिस चाहत्यांना पुन्हा नदाल मिळाला.
Comments
Loading...
%d bloggers like this: