राफेल नदालच्या पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून माघार !

पॅरिस । स्पेनच्या राफेल नदालने पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने माघार घेतली आहे.

याची अधिकृत घोषणा नदालने केली असून पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या ट्विटर अकाउंटवरून याची माहिती देण्यात आली आहे.

नदाल म्हणाला, “मी आज जसा खेळलो त्यावरून समजते की पुढील तीन सामने नक्कीच खेळू शकत नाही. गुडघ्याचा त्रास कायम थोडा होतोच परंतु कधी कधी तो खूप जास्त असतो. “

“माझ्यासाठी एटीपी वर्ल्ड टूर फायनल स्पर्धा लंडनमध्ये खेळण्यापेक्षा जास्त काळ टेनिस खेळायला प्राधान्य राहील. ” असेही तो पुढे म्हणाला.

नदालने माघार घेतल्यामुळे फिलिप क्राज़िनोविकला उपांत्यफेरीत पुढे चाल मिळाली आहे.

परवाच नदालने २०१७ वर्षअखेरीस आपले एटीपी क्रमवारीतील अव्वल स्थान पक्के केले होते.