राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारताला दिवसातले दुसरे तर एकूण चौथे सुवर्णपदक, वेंकट राहुल रगालाची सुवर्णमय कामगिरी

राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारताला आजच्या दिवसातले दुसरे तर एकूण चौथे सुवर्ण पदक मिळाले. वेंकट राहुल रगालाने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला हे पदक मिळवून दिले.

८५ किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली. त्याने स्नच प्रकारात १५१ किलो तर क्लीन आणि जर्क प्रकारात १८७ किलो वजन उचलले. असे त्याने सुवर्णपदक मिळवण्यासाठी अंतिम सामन्यात एकूण ३३८ किलो वजन उचलले.

स्नच प्रकारात वेंकट राहुलने पहिल्या प्रयत्नात १४७ किलो वजन त्याने उचलले होते, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याला १५१ किलो वजन उचलताना अपयश आले. पण त्याने तिसऱ्या प्रयत्नात त्याने १५१ किलो वजन उचलण्यात यश मिळवले.

क्लिन आणि जर्क प्रकारात त्याने पहिल्या प्रयत्नात १८२ किलो, दुसऱ्या प्रयत्नात १८७ किलो वजन उचलले. त्यामुळे त्याने एकूण ३३८ किलो वजन उचलून भारताला एकूण सहावे पदक मिळवून दिले. तसेच ही सहाही पदके भारताला वेटलिफ्टिंगमधेच मिळाली आहेत.