रघुल रंगासामीला अपकमिंग मोटरस्पोर्ट्स पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार

देशातील आघाडीच्या परफॉरमर्ससह विदेशातील विजेत्यांचा देखील सत्कार माजी अध्यक्ष जी. आर.कार्तिकेयन यांना जीवनगौरव पुरस्कार

मुंबई: जागतिक मोटरस्पोर्ट्समध्ये भारताच्या आघाडी परफॉरमर्सचा सत्कार एफएमएससीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सोमवारी करण्यात आला. चेन्नईच्या रघुल रंगासामीला अपकमिंग मोटरस्पोर्ट्स पर्सन ऑफ द ईयर पुरस्काराने गौरविण्यात आले.

25 वर्षीय या रेसरसाठी हे वर्ष कमालीचे चांगले राहिले. त्याने जे के टायर एफएमएससीआय राष्ट्रीय रेसिंग अजिंक्यपद स्पर्धेत एलजीबी फॉर्म्युला 4 चे जेतेपद मिळवले. यासोबतच एमआरएफ एमएमएससी एफएमएससीआय इंडीयन राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये एफएफ 1600 गटात चमक दाखवली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला प्रतिष्ठेचा रेमंड गौतम सिंघनिया चषक मिळाला.   या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एफआयएचे ( आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल संघटना) अध्यक्ष जीन टोड उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अनेक स्टार्सच्या उपस्थितीत बक्षीस वितरण पार पडले.फॉर्म्युला वन मधील फेरारीच्या  चांगल्या कामगिरीचे श्रेय हे टोड यांना दिले जाते. त्यांनी भारतीय मोटरस्पोर्ट्सच्या प्रगतीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जागतिक स्तरावर आपली चमक दाखवण्यास  हा देश सज्ज असल्याचे देखील ते म्हणाले.
   

एफएमएससीआयचे नवनिर्वाचित अध्यक्षतेखाली जे. पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या वार्षिक सोहळ्यात 61 विजेत्यांना गौरविण्यात आले.एफएमएससीआयचे माजी अध्यक्ष जी.आर. कार्तिकेयन (1981-82 आणि 1985-87)यांना भारतीय मोटरस्पोर्ट्समधील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
     

भारतीय मोटरस्पोर्ट्सच्या सुवर्णकाळात आपण पदार्पण करत आहोत. आम्ही सर्वच प्रकारात स्पर्धांचे आयोजन करत आहोत आणि आपले मुले व मुली या स्पर्धेत सहभाग नोंदवत असून जागतिक स्तरावर ते जिंकत आहेत. यापूर्वी असे घडले नाही. आम्ही लवकरच आणखीन गोष्टींचा समावेश करणार असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.
     

एफएमएससीआयने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्यासाठी विशेष पुरस्कार  देण्यात आले. यामध्ये वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिपमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या गौरव गिलचा विशेष उल्लेख करावा लागेल. यासोबत अरमान इब्राहीम (लॅम्बोर्घिनी ट्रोफेओ सिरीज मध्ये पोडीयम फिनिश), अनींदिथ रेड्डी कोंडा (लॅम्बोर्घिनी ट्रोफेओ सिरीज मध्ये पोडीयम फिनिश), अमित्रजित घोष आणि अश्विन नाईक (ईआरसी 2 अॅक्रोपोलिस रॅली विजेते) आणि मालस्वानदावग्लिआना ( आशिया कप रोड रेसिंग इंडिया राऊंडमध्ये दुसरे स्थान ) यांना देखील पुरस्कार देण्यात आले.मीरा एरडा, स्नेहा शर्मा आणि श्रिया लोहिया या आघाडीच्या महिला ड्रायव्हर्सना आऊटस्टँडिंग वुमन इन मोटरस्पोर्ट्स पुरस्काराने गौरविण्यात आले.