राहुल बनला ६०० रेडींग गुण मिळवणारा पहिला खेळाडू

प्रो कबड्डीचा पोस्टर बॉय म्हणून ओळखला जाणारा राहुल चौधरीने रेडींगमध्ये ६०० गुण मिळवण्याचा खूप मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. राहुलने ही कामगिरी बेंगलूरु बुल्स विरुद्ध खेळताना केली. या सामन्यात बेंगलूरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारने ३०० रिडींग गुण मिळवण्याची कामगिरी केली तर राहुलने ६०० रिडींग गुण मिळवण्याची कामगिरी केली.

या सामन्याअगोदर राहुल चौधरीच्या नावावर एकूण ७३ सामन्यात खेळताना ६३७ गुण होते. त्यात रेडींगमध्ये त्याने ५९५ गुण मिळवले होते. बाकीचे ४२ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले होते. बेंगलूरु बुल्स विरुद्धच्या सामन्यातील पहिले सत्र संपण्याच्या अवघे काही मिनिटे त्याने बोनस गुण मिळवत ६०० गुण मिळवण्याची कामगिरी केली.

यदाकदाचित आपणास माहित नसेल तर-

#१ राहुल चौधरी हा एकमेव खेळाडू आहे ज्याने प्रो कबडीमध्ये फक्त रेडींगमध्ये ६०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

#२ प्रो कबड्डीमध्ये अध्याप फक्त रेडींगमध्ये ५०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण राहुल व्यतिरिक्त अन्य मिळवलेले नाहीत.

#३ रेडींगमध्येप्रो कबडीमध्ये सर्वाधीक गुण मिळवण्याच्या यादीत क्रमांकावर असणारा खेळाडू काशीलिंग आडके आहे. त्याच्या नावावर रेडींगमध्ये ४५७ गुण आहेत.

#४ प्रो कबडीमध्ये फक्त दोन खेळाडूंनी एकूण ५०० पेक्षा जास्त गुण मिळवण्याची कामगिरी केली आहे. एक म्हणजे राहुल चौधरी ज्याच्या नावावर या सामन्याअगोदर ६३७ गुण होते . दुसरा म्हणजे अनुप कुमार ज्याच्या नावावर ७१ सामन्यात एकूण ५०३ गुण आहेत.