राहुल द्रविड जे काम करतोय ते किती पाकिस्तानच्या दिग्गजांना करायला जमेल?

भारतीय संघाने आज पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला तब्बल २०३ धावांनी धूळ चारत १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. भारतीय संघ ३ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजेतेपदासाठी लढणार आहे.

पृथ्वी शॉच्या टीम इंडियाच्या यशात सर्वात मोठा वाट आहे तो प्रशिक्षक राहुल द्रविडचा. त्यामुळे सध्या द्रविडवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात पाकिस्तानमधील काही दिग्गजांचाही समावेश आहे.

आज पाकिस्तान संघाला निराशाजन पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांच्या संघावर जोरदार टीका झाली. परंतु पाकिस्तान संघाची काही मोठ्या खेळाडूंनी आणि पत्रकारांनी पाठराखण केली.

विस्डेन पाकिस्तानचे जेष्ठ पत्रकार असिफ खान यांनी द्रविडचे कौतुक करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जोरदार ताशेरे ओढले आहे.

भारताकडे अतिशय महत्वाकांक्षी द्रविड आहे जो हा संघ एक चांगला बनण्यासाठी सतत कष्ट घेत आहे असे पाकिस्तानमध्ये एकतरी माजी खेळाडू करतोय का असे प्रश्न विचारले जात आहे.

खेळाडू जेव्हा तरुण असतात तेव्हा त्यांना एक चांगले खेळाडू म्हणून घडवणे हे मोठं काम आहे. राहुल द्रविड हे गेले २ वर्ष करत आहे. ह्याच वयात योग्य मार्गदर्शन, योग्य सराव आणि शिक्षण मिळालं तर नक्कीच चांगले खेळाडू देशाला मिळू शकतात.