द्रविडचं राहणार भारत अ संघाचा प्रशिक्षक

सद्ध्या भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदावरून चर्चा सुरु असताना भारत अ आणि इंडिया अंडर १९ संघांचा प्रशिक्षक राहुल द्रविडचं राहण्याची शक्यता आहे.

ज्याप्रमाणे मुख्य प्रशिक्षकाठी नव्याने अर्ज मागवण्यात आले तशी कोणतीही पद्धत यासाठी अवलंबली जाणार नसल्याचं बोललं जात आहे.

राहुल द्रविडच्या करारामध्ये प्रशिक्षकाला पुन्हा दिली जाणार नाही असं काहीही नाही. तर कुंबळेच्या करारामध्ये तसं लिहिल्यामुळे त्याच्या बद्दल नव्याने अर्ज मागवण्यात आले आहेत.

इंडियन एक्सप्रेसमधील रिपोर्ट्स प्रमाणे कॅक ( Cricket Advisory Committee )अर्थात क्रिकेट सल्लागार कमिटीने द्रविडला दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा रिपोर्ट्स आधीच बीसीसीआयला दिला आहे. क्रिकेट सल्लागार कमिटीमध्ये सचिन, गांगुली, लक्ष्मण हे दिग्गज माजी खेळाडू आहेत.
क्रिकेट सल्लागार कमिटीने सामंती दिल्यामुळे आता फक्त यासाठी मानधन किती द्यायचं यावर बोलणी होणार आहे. पूर्वीच्या कराराप्रमाणे राहुल द्रविडला १० महिन्यासाठी ४ कोटी रुपये दिले गेले होते.