पुढील दोन वर्षासाठी राहुल द्रविडच असेल भारतीय ‘अ’ संघ आणि अंडर- १९ टीमचा प्रशिक्षक

बीसीसीआयने आज जाहीर केले आहे की राहुल द्रविड हाच पुन्हा पुढील २ वर्षांसाठी ‘अ’ आणि अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक असेल. या मुदतवाढीचचे मुख्य कारण म्हणजे राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून जबाबदारी अत्यंत उत्तमरीत्या बजावल्याचं सांगितलं जात आहे.

बीसीसीआयचे प्रमुख ‘सी.के.खन्ना’ म्हणतात राहुलने गेल्या २ वर्षात खुप चांगली कामगिरी बजावली असून त्याच्या नेतृत्तवाखाली टीमने खूप चांगली कामगिरी केली असतानाच त्याने टीम मध्ये चांगले बदल केले याशिवाय नवीन खेळाडूंना संधी दिली.

त्याचप्रमाणे बीसीसीआयचे सेक्रेटरी ‘अमिताभ चौधरी ‘ म्हणतात राहुल हा शांत आणि सवेंदनशील आहे. नवीन खेळाडूंना संधी देऊन त्यांना तो बरोबर मार्गदर्शन करतो त्यांमुळेच टीमची बाजू मजबूत आणि चांगला निकाल हाती येतो. मी राहुलला पुढील दोन वर्षांसाठी शुभेच्छा देतो .

आताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा ‘अ’ संघ जाहीर झाला असून मनीष पांडे वनडे मालिकेसाठी कर्णधार असेल .