१ महिना आणि ७ दिवसांनी रेल्वेने काढला हरयाणाविरुद्धच्या राष्ट्रीय स्पर्धेतील पराभवाचा वचपा

मुंबई ।राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ३२  वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत झालेल्या पराभवाचा वचपा आज रेल्वेने काढत फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत आज हिमाचल प्रदेशला १ गुणाने पराभव करत विजेतेपद पटकावले. ह्या सामन्यात रेल्वेने हिमाचल 

ह्या सामन्यात पूर्वार्धात पूर्णपणे रेल्वे संघाने वर्चस्व राखले होते. ते पूर्वार्धात असे आघाडीवर होते. परंतु उत्तरार्धात हिमाचल प्रदेशने केलेल्या चांगल्या खेळीमुळे सामना  अतिशय चुरशीचा झाला. अगदी शेवटच्या रेडमध्ये रेल्वेच्या पिंकी रॉयने निधी मेहताला डॅश मारत एक गुण घेतला आणि ह्याच गुणांच्या आधारे रेल्वेने तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.  

रेल्वेच्या या विजयात महाराष्ट्राची सोनाली शिंगटेने रेल्वेकडून १२ रेडमध्ये ४ गुण आणि १ बोनस घेतला तर पायल चौधरीने १२ रेडमध्ये ४ गुण घेताना एक बोनस गुण घेतला. 

निधी शर्माने हिमाचल कडून ८ चढायांमध्ये ६ गुण घेतले परंतु तिची ३ वेळा पकड झाली तर पिंकीने रेल्वेकडून ३ यशस्वी पकडी करताना एक सामना जिंकून देणारी पकड केली. 

सामन्याच्या उत्तरार्धात प्रत्येक गुणासाठी चाहत्यांकडून खेळाडूंना मोठा पाठिंबा मिळत होता. विजयानंतर रेल्वेच्या खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला.