इंग्लंड विरुद्ध भारत: दुसऱ्या कसोटीआधी पावसाचा व्यत्यय

लंडंन। भारत विरुद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज(9 आॅगस्ट) लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

मात्र या सामन्याआधी लंडंनमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे सामन्याला उशीर होण्याची शक्यता आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होणार होता.

पावसामुळे खेळपट्टीवरही कव्हर टाकण्यात आले असल्याचा फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. याबरोबरच पाऊस पडत असल्याचे फोटो हर्षा भोगले, सौरव गांगुलीनेही शेअर केले आहेत.

भारतीय संघाला पहिला सामना 31 धावांनी गमवावा लागला होता, त्यामुळे या भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. पण त्याचबरोबर इंग्लंडचा संघही त्यांची विजयी लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

त्याचबरोबर खेळपट्टीवर गवत असल्याने या सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची दाट शक्यता आहे.

आत्तापर्यंत भारताने इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स मैदानावर 17 कसोटी सामने खेळले असून त्यातील 2 सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. तसेच 11 सामन्यात पराभव पत्करला आहे, तर 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारताने 1986 साली लॉर्ड्सवर पहिला कसोटी विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 ला भारताने लॉर्ड्सवर कसोटी विजय मिळवला आहे. 2014 नंतर भारत आणि इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर कसोटी सामना झालेला नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्यामागे हे आहे खरे कारण

सौरव गांगुली म्हणतो, हे केल्यास आर अश्विनची ताकद आणखी वाढणार

-आयसीसीने घेतला महत्त्वाचा निर्णय, टी-२० क्रिकेट येणार धोक्यात!