तिसऱ्या टी२० सामन्यावर पावसाचे सावट

तिरुवनंतपुरम । भारत विरुद्ध न्यूझीलँड तिसऱ्या टी२० सामन्यापूर्वी केरळ राज्याच्या राजधानीच्या शहरात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. गेले 3 दिवस या शहरात पाऊस पडत असून आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर या शहरात पाऊस होत आहे. 

ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा मध्यभाग कव्हरने झाकण्यात आला आहे. रविवारी दुपारीही येथे पाऊस पडला.

देशातील हे ५०वे आंतरराष्ट्रीय मैदान आहे.

केरळ क्रिकेट असोशिएशननेही या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. ” आम्ही पूर्ण तयारी केली आहे. या मैदानाची पाण्याचा निचरा होण्याची सिस्टिम खूप चांगली आहे. कालच्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. परंतु मैदान २०-३० मिनिटात मैदान तयार झाले. ” असे केरळ क्रिकेट असोशिएशनचे सचिव म्हणाले.