पुण्याला मिळणार आयपीएलचा नवा संघ ?

मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी आयपीएलमधील राजस्थान रॉयल आणि चेन्नई सुपरकिंग्स हे दोन संघ मागील दोन आयपीएल मोसमांना मुकले होते. २०१८च्या आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ पुनरागमन करतील. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार राजस्थान रॉयल्स हा संघ आपले नाव आणि जागा बदलून पुण्यात स्थलांतरित होणार आहे. आता त्यांचे नाव फक्त ‘रॉयल्स’ असे असणार आहे.

आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने मागील महिन्यात या नाव बदलाच्या मागणीला मान्यता दिली आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सचे माजी मालक एन श्रीनिवासन यांनीही त्यांचे इंडिया सिमेंट या कंपनीतले शेअर शेयर होल्डर्सला ट्रान्सफर केले आहेत. आता त्यांची कंपनीत फक्त ५० लाखांचे शेअर आहेत.

यदाकदाचित आपणास माहीत नसेल तर

२०१५मध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांना निलंबित करण्यात आले होते. निलंबनाचे कारण त्यांच्या मालक राज कुंद्रा आणि गुरुनाथ मय्यप्पन यांचे सट्टेबाजांवर असलेले संबंध होते. गुरुनाथ मय्यपन के एन श्रीनिवासन यांचे जावई आहेत. या दोन्ही संघांना २०१६ आणि २०१७ या दोन्ही आयपीएल मोसमासाठी बंदी घालण्यात आली होती. आता २०१८मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ भाग घेतील. हे दोन्ही संघ आयपीएलचे विजेते राहिले आहेत. राजस्थान रॉयल्सने आयपीएलचे पहिल्या मोसमात विजेतेपद पटकावले होते.

तर चेन्नई सुपरकिंग्सने याआधी दोन वेळा आयपीएलच्या चषकावर आपले नावा कोरले आहे. या मागील दोन्ही मोसमात पुणे सुपर जायंट्स संघाचे मालक असलेले संजीव गोयंका यांच्याबरोबर रॉयल्स संघाचा करार झाला आहे असे बोलले जात आहे. त्यामुळेच या करारानुसार राजस्थान रॉयल्स या नावातून राजस्थान हे नाव काढण्यात आले आहे आणि फक्त ‘रॉयल्स’ असे नाव ठेवण्यात आले आहे.