रोहित शर्माचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागम, असा आहे राजस्थान रॉयल्स विरुद्ध ११ जणांचा संघ

मुंबई। आज(13 एप्रिल) आयपीएल 2019 मधील 27 वा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्माने पुनरागमन केले आहे. तो किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्याला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मुकला होता. त्याच्याऐवजी किरॉन पोलार्डने मुंबईचे प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते.

आजच्या सामन्यासाठी मुंबईच्या संघात सिद्धेश लाडच्या ऐवजी रोहित संघात परत आला आहे. हा एकमेव बदल मुंबईने या सामन्यासाठी केला आहे.

तसेच राजस्थानच्या संघात लियाम लिविंगस्टोनला दुखापतग्रस्त बेन स्टोक्सऐवजी संधी दिली आहे. तर क्रिष्णप्पा गॉथमलाही आज राजस्थानच्या 11 जणांच्या संधात संधी मिळाली आहे.

असे आहेत 11 जणांचे संघ-

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, अल्झारी जोसेफ, राहुल चहर, जेसन बेऱ्हेन्डॉफ, जसप्रित बुमराह

राजस्थान रॉयल्स – अजिंक्य रहाणे (कर्णधार), जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), स्टीव्हन स्मिथ, राहुल त्रिपाठी, लिआम लिव्हिंगस्टोन, कृष्णप्पा गॉथम, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी.

महत्त्वाच्या बातम्या –

‘नो बॉल’ विवाद प्रकरणी सौरव गांगुलीचा एमएस धोनीला पाठिंबा…

 चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध बेन स्टोक्सने घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धोनीकडून रविंद्र जडेजाला बसला मार, पहा व्हिडिओ