राजीव शुक्लाच राहणार आयपीएलचे अध्यक्ष

पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १०व्या पर्वाचे राजीव शुक्ला हेच अध्यक्ष राहणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याबद्दलचा निर्णय घेतला आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने मंजुरी दिली.
५७ वर्षीय शुक्ला यांना कार्यकाळ वाढवून मिळण्याची कोणतीही शक्यता नसता त्यांना तो वाढवून मिळाला. शुक्ला हे एक जेष्ठ क्रिकेट प्रशासक असून त्यांनी ९ वर्षांपेक्षा जास्त काळ बीसीसीआय या संस्थेत काम केले आहे.
सुरुवातीच्या काळात आयपीएल लिलावाला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यापासून कोर्टाने नियुक्त केलेल्या कमिटीने बंदी घातली होती. तरीही शुक्ला यांनी बेंगलोर येथे जाऊन आयपीएल संघ मालकांसमोर भाषण केले होते. आता त्याच कमिटीने शुक्ला यांच्या परत केलेल्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
आयपीलचा यंदाचा दहावा मोसम असून तो ५ एप्रिल पासून सुरु होणार आहे. पहिला सामना गतविजेता सनरायसर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चैलेंजर बेंगलोर यांच्यात होणार आहे.