माजी क्रिकेटपटूचे इशांत शर्मावर गंभीर आरोप

भारताचे माजी वेगवान गोलंदाज राजू कुलकर्णी यांनी इशांत शर्मावर कडाडून टीका केली आहे. त्यांनी इशांत अनियमित गोलंदाज म्हटले आहे.

राजू यांच्या मते इशांत शर्माने आत्तापर्यंत ७९ कसोटी सामने खेळले आहेत जी चांगली गोष्ट आहे, पण इशांतने कधीही संघात महत्वाची भूमिका निभावलेली नाही हीच इशांतसाठी मोठी समस्या आहे. तो अनियमित गोलंदाज आहे आणि तो नेहेमी नवे तंत्र आणि रणनीती घेऊन मैदानात उतरतो त्यामुळे तो स्वतःच खूप गोंधळलेला असतो, असे राजू यांनी म्हटले आहे.

इशांतने भारताकडून ७९ कसोटी सामन्यात २२६ बळी घेतले आहेत आणि ८० वनडे सामन्यात ११५ बळी घेतले आहेत. त्याने बांगलादेश विरुद्ध २००७ मध्ये कसोटी पदार्पण केले होते.

इशांतला दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ११ जणांच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ७२ धावांनी विजय मिळवला होता.