हा तर द्रविड आणि झहीरचा अपमान: रामचंद्र गुहा

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर नियुक्त केलेल्या प्रशासक समितीचे माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी सध्या प्रशिक्षक पदावरून सुरु असलेल्या वादावर भाष्य  करताना झहीर खान आणि राहुल द्रविड यांच्या निवडीबद्दल सुरु असलेल्या घोळाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
याबद्दल ट्विटरच्या माध्यमातून गुहा म्हणतात की हा तर या दोन दिग्गज खेळाडूंचा अपमानच आहे. कुंबळे बद्दल जे झाले तेच आता पुढे झहीर आणि द्रविड बद्दल होत आहे. ज्या प्रकारे त्याच्या नियुक्तीचा खेळ बीसीसीआयने केला आहे ते खूप चुकीचे आहे.

गुहा यांनी काल ट्विट केले ज्यात ते म्हणले, “अनिल कुंबळेला जी लज्जास्पद वागणूक देण्यात आली, तसेच काहीशे आता झहीर खान आणि राहुल द्रविड यांच्या बरोबर झाला आहे.

“कुंबळे, द्रविड आणि झहीर हे क्रिकेट मधील महान खेळाडू होते, त्याच्या सारख्या खेळाडूंनाचा असे सार्वजनिकपणे पाणउतारा करणे चुकीचे आहे,” असे ते म्हणाले.
शनिवारी रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर बीसीसीआयने दावा केला होता की द्रविड आणि झहीर विदेशी क्रिकेट दौऱ्यासाठी अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजी असतील. पण त्यांची निवड पूर्ण वेळ प्रशिक्षक म्हणून करण्यात आली होती का नव्हती या वर बीसीसीआयने कोणते ही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते.

गुहा यांनी भारतीय क्रिकेटमधील “सुपरस्टार संस्कृती” चे उपहासात्मक कौतुक केले होती आणि “हितसंबंधांचे विरोधाभास” विषयावर माजी खेळाडूंवरही टीका केली होती.