क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये २५% आरक्षण द्या! – रामदास आठवले

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी केली.

भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम फेरीचा सामना हा फिक्स होता असा आरोप केल्यांनतर आठवले यांच्याकडून क्रीडाक्षेत्राबद्दल हे दोन दिवसातील दुसरं महत्त्वाचं वक्तव्य आलं आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारताचा संघ एवढा मजबूत असूनही एकदम एकतर्फी झाला. त्यामुळे शंकेला वाव असल्याकारणामुळे त्या सामन्याची सखोल चौकशी व्हावी असे आठवले यांना वाटते. गुजरातमध्ये एका कार्यक्रमादरम्यान आठवले यांनी हे वक्तव्य केलं होत.

काल नागपुरात एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत असताना क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी केली.

अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण संघात दिले तर काय बिघडते. उलट टीमची कामगिरी सुधारेल, असेही आठवले पुढे म्हणाले.